भारतीय वायुसेनेद्वारा दिनांक ६ मे २०१७ ते १२ मे २०१७ या कालावधीत महाराष्ट्र व गोवा राज्यातील इच्छुक उमेदवारांकरिता तासगाव (जिल्हा सांगली) येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला जात असून या मेळाव्यामध्ये भारतीय वायुसेना (सुरक्षा/ गरुड) व मेडीकल असिस्टंट या पदासाठी निवड केली जाणार आहे.

भारतीय वायुसेना (रक्षक/ गरुड) पात्रता पुढीलप्रमाणे भरतीची दिनांक व वेळ ८ मे २०१७, पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत (उशिरा येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही), शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी पास आर्ट्स/ कॉमर्स/ सायन्स शाखेतून किमान ५० टक्के गुणासह उत्तीर्ण व इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण आवश्यक. वय जन्मतारीख ७ जुलै १९९७ ते २० डिसेंबर २००० या दरम्यान जन्म असावा (१७ ते २१ वर्ष). शारीरिक पात्रता- उंची- १५२.५ सेंमी, शारीरिक क्षमता चाचणी १.६ किमी धावणी (५ मिनिटे ४० सेकंदांमध्ये), ८ चिनअप्स, २० पुशअप्स आणि २० सिटअप्स, आवश्यक कागदपत्रे १० वी पासचे मूळ सर्टिफिकेट, १२ वी पासचे मूळ सर्टिफिकेट व मार्कलिस्ट, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल), लेखी  परीक्षा ५० मार्कसचे ५० प्रश्न (इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान) अनुकूल क्षमता चाचणी (अडॅप्टबिलिटी टेस्ट) अनुकूलक्षमता चाचणी क्र. १ व २ (अडॅप्टबिलिटी टेस्ट).

भारतीय वायुसेना (मेडिकल असिस्टंट) भरतीची दिनांक व वेळ १० मे २०१७, पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत (उशिरा येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही), शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी पास सायन्स शाखेतून किमान ५० टक्के गुणासह उत्तीर्ण व इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण व जीवशास्त्र विषयक आवश्यक. वय जन्मतारीख ७ जुलै १९९७ ते २० डिसेंबर २००० या दरम्यान जन्म असावा (१७ ते २१ वर्ष). शारीरिक पात्रता- उंची- १५२.५ सेंमी, आवश्यक कागदपत्रे १० वी पासचे मूळ सर्टिफिकेट, १२ वी पासचे मूळ सर्टिफिकेट व मार्कलिस्ट, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल), लेखी  परीक्षा ५० मार्कसचे ५० प्रश्न (४५ मिनिटामध्ये सोडविणे). शारीरिक क्षमता चाचणी १.६ किमी धावणी (७ मिनिटात पूर्ण करणे), १० पुशअप्स, १० सिटअप्स आणि १० बैठका. संयोगक्षमता चाचणी (अडॅप्टबिलिटी टेस्ट) संयोगक्षमता चाचणी (एटी २).

सैन्य भरती प्रक्रिया सर्वासाठी मोफत असून सर्व तऱ्हेने पात्र असणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार भरती केली जाते. त्यासाठी कोणत्याही एजंटची/ मध्यस्थीची मदत घेऊ नये किंवा त्यांना पैसे देऊ नये व अशा फसवणुकीपासून सावध राहावे तसेच आपण एजंट/ मध्यस्थांच्या सान्निध्यात असाल तर त्याची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला/ भरती अधिकाऱ्याला किंवा अँटी करप्शन सेल (लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सांगली) दूरध्वनी क्रमांक ०२३३- २३७३०९५, ८६००८९७१९९, ९४२१८५८५७० यांना द्यावी. गैरवर्तणूक करणाऱ्या उमेदवारास सैन्य भरतीतून अपात्र करून त्याचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.