राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाची वाट पाहात असल्याची टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या तुलना रोमन राजा नीरोशी केली. मंगळवारी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत विषम परिस्थितीचा सामना करतो आहे. मात्र, राज्य सरकारला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करतो आहोत. पण त्याकडेही सरकार लक्ष देण्यास तयार नाही. संपूर्ण रोम जळत असताना तत्कालिन राजा नीरोने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे फडणवीस हे देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदेशांची वाट बघत असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या चर्चेमध्ये राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर चौफेर टीका केली.