महाड तालुक्यातील शिवथरघळ परिसरात एका शेतकऱ्यानं जनावरांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतात जाळं लावलं होतं. त्यात बिबट्या अडकला होता. त्याची तब्बल १२ तासांनी सुटका करण्यात बोरीवली उद्यानातील अधिकाऱ्यांना यश आलं आहे.  महाड तालुक्यातील सुनेभाऊ गावात जनावरं शेतातील पिकाची नासधूस करतात. त्यामुळं पिकाचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण मोरे यांनी शेतात जाळे लावलं होतं. या जाळ्यात मंगळवारी संध्याकाळी बिबट्या अडकला.

या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकाला पाचारण केले. तब्बल १२ तास जाळ्यात अडकलेल्या बिबट्याची दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास सुटका करण्यात आली.सुनेभाऊ गावातील जंगलभागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होती.

nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका