दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवतीभवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. येत्या नवरात्रात ‘लोकसत्ता’ अशा दुर्गाचे दर्शन समाजाला ‘शोध नवदुर्गा’चा या उपक्रमाच्या माध्यमातून घडवणार असून आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुर्गाची माहिती कळवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य लोकशक्ती ‘लोकसत्ता’तर्फे यंदा दुर्गाची ओळख करून दिली जाईल. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचाराशी लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवत आहे.
अशा दुर्गाची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच ‘लोकसत्ता’ने ‘अभ्युदय बँके’च्या सहकार्याने हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे.
या दुर्गा शहरापासून खेडय़ांपर्यंत कोणत्याही भागातील असू शकतील, कोणत्याही उद्योग-व्यवसायातील असू शकतील, नोकरी करणाऱ्या असू शकतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यां वा गृहिणी देखील असू शकतील. त्या समाजाच्या दृष्टीने सामान्य असतील; पण त्यांचे कार्य असामान्य आहे. म्हणूनच ते सर्वासमोर येणे ‘लोकसत्ता’ला अगत्याचे वाटते. आपल्याला ओळख असलेल्या अशा दुर्गेची माहिती वाचकांनी ‘लोकसत्ता’कडे पाठवावी. त्यातून नऊ दुर्गाची निवड केली जाणार आहे.
ही माहिती फॅक्सद्वारे (२७६३३००८) पाठवावी; तसेच ही माहिती durga.loksatta@expressindia.com या ई-मेलवरही     पाठवता येईल.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर