रायगड जिल्ह्य़ात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठय़ा उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. यानिमित्ताने जिल्ह्य़ातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेशपंचायतनच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. सकाळी ओहोटीच्या काळात किल्ल्याकडे जाण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. भरती आल्यानरंतर भाविकांनी बोटीने किल्ल्यात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या मंदिरात दिवसभर पूजाअर्चा, भजन-कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमांला भाविकांनी हजेरी लावली. शहरातील अन्य गणेश मंदिरेही भाविकांनी फुलून गेली होती.
अष्टविनायकांपकी पालीचा बल्लाळेश्वर व महडचा सिद्धिविनायक ही दोन स्थळे रायगड जिल्ह्य़ात आहेत. येथील गणेश मंदिरे भाविकांनी अक्षरश फुलून गेली होती. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानतर्फे मंडप घालण्यात आला होता. श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या जास्वंदीची फुले, हार, दुर्वा, पेढे यांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत होती.
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सिद्धिविनायक, चिरनेरचा महागणपती, अलिबाग तालुक्यातील नंदुरबाळ, कडावचा बालदिगंबर, जांभुळपाडा येथील सिद्धिगणेश, मुगवलीचा स्वयंभू गणेश अशा प्रमुख मंदिरांमध्येही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. गावोगावच्या गणेश मंदिरांमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे लोण आता शहरातून ग्रामीण भागातही पोहोचले आहे. मंडळांतर्फेही श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही या मंडळांनी हाती घेतले आहेत.

mahavir jayanti celebration marathi news
सांगली: भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन