रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळील देवकुंड धबधबा येथे अडकलेल्या ५५ विद्यार्थ्यांची पोलिसांनी सुटका केली आहे. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने देवकुंडजवळ रविवारी ५५ विद्यार्थी अडकले होते. दोरीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

व्हॉट्स अॅपवर ट्रेकिंगची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार झाला होता. मुंबईतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी या ग्रुपमध्ये होते. या विद्यार्थ्यांनी भिरा गावातील देवकुंड धबधबा येथे पावसाळी सहलीचे आयोजन केले होते. सुमारे ५५ विद्यार्थी देवकुंड धबधब्यावर गेले होते. हे सर्व विद्यार्थी १७ ते २० वर्ष या वयोगटातील होते. रविवारी सकाळी हे सर्व जण देवकुंड धबधब्याला जाण्यासाठी मुंबईतून निघाले होते. देवकुंड धबधब्याच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कुंडलिका नदीच्या पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे ५५ विद्यार्थी अडकून पडले.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक

विद्यार्थी अडकल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. विद्यार्थी ज्या भागात अडकले होते त्या भागात जाण्यासाठी पोलिसांना सुमारे सात किलोमीटर पायी चालत जावे लागले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुटका झाली आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. माणगाव पोलिसांच्या सात जणांच्या पथकानेच ही मोहीम राबवली. ५५ पैकी एक विद्यार्थी पाण्यात वाहून गेला होता. सुदैवाने एका खडकाचा आधार घेत त्या विद्यार्थ्याने स्वतःचा जीव वाचवला.