महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी (२०१८) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा १ ते २४ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बोर्डाची परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी एकूण १७ लाख २७ हजार ४९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ४, ७२८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

असे असेल वेळापत्रक:

१ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी २) – प्रथम भाषा

१ मार्च (दुसरे सत्र – दुपारी ३ ते संध्याकाळी ६) – फ्रेंच

३ मार्च (पहिले सत्र – सकाळी ११ ते दुपारी २) – द्वितीय आणि तृतीय भाषा

५ मार्च – (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी २) – हिंदी

५ मार्च- (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) हिंदी (संयुक्त Composite)

५ मार्च – (दुसरे सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ६) – व्यावसायिक अभ्यासक्रम Vocational course

६ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी २) द्वितीय आणि तृतीय भाषा

६ मार्च (दुसरे सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५) द्वितीय आणि तृतीय भाषा (संयुक्त अभ्यासक्रमक) composite course

८ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी २) इंग्रजी (प्रथम किंवा तृतीय भाषा)

१० मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी २) गणित पेपर १ (बिजगणित), Arithmetic (For Special Needs Divyanga Students) अंकगणित (विशेष विद्यार्थ्यांसाठी)

१० मार्च (दुसरे सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५) सामान्य गणित पेपर २

१२ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) गणित पेपर २ भूमिती (Geometry)

१२ मार्च (दुसरे सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५) सामान्य गणित पेपर २

१४ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर १

१४ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १.३०) शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र (विशेष विद्यार्थ्यांसाठी) Physiology Hygiene and Home Science (For Special Needs Divyanga Students)

१६ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर २

१९ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) समाजशास्त्र पेपर १ (इतिहास आणि राज्यशास्त्र) ocial Sciences Paper I (History and Political Science)

२१ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) समाजशास्त्र पेपर २ (भूगोल आणि अर्थशास्त्र) (Geography and Economics)

२२ मार्च (पहिले सत्र सकाळी ११ ते दुपारी १) Information Communication Technology माहिती प्रसारण तंत्रज्ञान

>> mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही पाहता येईल.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा