५० टक्के खर्च राज्यसरकार उचलणार ’ मुख्यमंत्र्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र
माथेरानच्या रेल्वेला सध्या समस्यांचे ग्रहण लागले आहे. नादुरुस्त इंजिनामुळे रेल्वेसेवा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे माथेरान रेल्वेसाठी नवीन रेल्वे इंजिन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे. रेल्वे मंत्रालयाने ६ नवीन इंजिन पुरवण्यास मान्यता दिल्यास त्यासाठी लागणारा ५० टक्के खर्च उचलण्याची राज्यसरकारची तयारी असल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले आहे.
माथेरानची रेल्वे ही येथील जीवनवाहिनी आहे. माथेरानचे अर्थकारण या रेल्वेवर अवलंबून आहे. रेल्वेच्या आकर्षणामुळेच देशाविदेशातील जवळपास १० लाख पर्यटक भेट देत असतात. मात्र इंजिनातील बिघाडामुळे ही रेल्वे सेवा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पर्यटकांना पायपीट करावी लागते आहे. नादुरुस्त इंजिनामुळे नेरळ ते माथेरान हे २१ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला अडीच ते चार तासांचा कालावधी लागतो आहे. याचा विपरीत परिणाम माथेरानच्या पर्यटन उद्योगावर होत आहे.
त्यामुळे माथेरान रेल्वेला सुरळीत ठेवण्यासाठी सहा नवीन इंजिन उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते आहे. तसेच माथेरान रेल्वे स्टेशनला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, रेल्वे स्टेशन परिसरातील उपाहारगृह आणि रेल्वे विश्रामगृहांचे नूतनीकरण करण्यात यावे, अमनलॉज येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेशनचे लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी केली जाते आहे.
माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची यासंदर्भात भेट घेतली होती, माथेरानकरांच्या रेल्वे समस्याबाबत निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून आगामी रेल्वे अर्थसंकल्पात माथेरान रेल्वेसाठी तरतूद करण्याची लेखी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून सहा नवीन इंजिने उपलब्ध करून द्यावीत गरज भासल्यास त्यासाठी लागणारा ५० टक्के खर्च राज्य सरकार उचलेल अशी हमी त्यांनी दिली आहे. माथेरान ते अमन लॉज स्टेशन दरम्यान धूपप्रतिबंधक िभत उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, यामुळे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असणाऱ्या माथेरानची सॉइल इरोजन समस्या थांबण्यास मदत होईल अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडून रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली आहे.

difference between Cabinet Minister and Minister of State salary of MP
केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या अधिकार आणि कर्तव्यात काय फरक असतो?
shinde group of shiv sena unhappy for not getting cabinet berth
मंत्रिमंडळावर शिंदे गट नाराज; सात खासदार असतानाही कॅबिनेट मंत्रीपद का नाही? बारणे
pm modi cabinet formation 2024 rajnath singh amit shah and gadkari retain ministries
ज्येष्ठ मंत्र्यांची खाती कायम; मित्रपक्षांना नागरी विमान वाहतूक, उद्योग खाती, कृषी, रेल्वेसह कळीची मंत्रालये भाजपकडेच, गडकरींकडे सलग तिसऱ्यांदा ‘रस्ते विकास’
jp nadda takes oath
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नड्डांची वापसी; अभाविप कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Since the BJP did not have much influence in South India the states in this region were given a nod in the Union Cabinet
दक्षिण भारताला झुकते माप
Nitin Gadkari will take oath as Union Cabinet minister for the third time
गडकरींच्या रुपात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूरला स्थान
Rejection of electricity smart prepaid meters India Aghadi demands to cm eknath shinde to continue connection of existing post paid meters
विजेच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला नकार; सध्याच्या पोस्टपेड मीटर्स जोडण्या चालू ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे इंडिया आघाडीची मागणी
Union Home Ministry threatened 150 Collectors by phone Allegation of Nana Patole
गोदी मीडियाचे एक्झिट पोल! नाना पटोलेंचा आरोप, म्हणाले,‘केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले’