कर्जत तालुक्यात चौथा गुन्हा दाखल

तालुक्यात कोपर्डीच्या घटनेनंतर तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार, विनयभंग आणि छेडछाडीचे प्रकार वाढतच असून दोनच दिवसांपूर्वी शहरातील अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना ताजी असतानाच शनिवारी अशाच स्वरूपाचा चौथा गुन्हा दाखल झाला. तालुक्यातील शिंदा येथील अल्पवयीन मुलीस लग्नाची मागणी घातली होती. मात्र घरच्यांनी नकार दिला म्हणून बंडू ऊर्फ प्रकाश पोपट चौधरी (वय २२, राहणार टाकळीचौधरी, ता. आष्टी, जिल्हा बीड) याने या मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केला. पीडिताच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

तालुक्यातील शिंदा येथील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस आष्टी तालुक्यातील बंडू ऊर्फ प्रकाश पोपट चौधरी याने मागणी घातली होती. मात्र मुलीच्या घरच्यांनी त्यास नकार दिला. नंतर  प्रकाश याने या अल्पवयीन मुलीस मंगळवारी लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले होते. या संदर्भात बुधवारी प्रकाश चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

प्रकाश याने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ही पीडित मुलगी शनिवारी घरी परतल्यावर तिने कुटुंबीयांना सर्व हकिगत सांगितली. त्यांनतर कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.