भरधाव वेगात जात असलेल्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे जण जागीच तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हत्तूर गावाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. हे गाव सोलापूर-विजापूर महामार्गावर आहे. वीरेंद्र लक्ष्मण तलवार (वय ३०, रा. उरण, नवी मुंबई), नितीन शंकर बिराजदार (वय २७, रा. धुळखेड. ता इंडी. जि. विजापूर), तेजस अशोक वाडदेकर (वय २७, सिधु विहार विजापूर रोड सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर मिलिंद दत्तात्रय वाघमारे (रा. सिधु विहार, विजापूर रोड, सोलापूर), आकाश सुर्यकांत गायकवाड (रा. उरण, नवी मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरातून विजापूरकडे कारमधून (एमएच ०२ सीडी ९४९६) पाचजण निघाले होते. हत्तूरजवळ एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात तीन वेळा उलटली व झाडावर जाउन आदळली. या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विजापूर नाका पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास