सियाचीन येथे हिमस्खलनामुळे शहीद झालेल्या नऊ भारतीय जवानांमध्ये सातारा जिह्यातील मस्करवाडीचे सुनील विठ्ठलराव सुर्यवंशी यांचाही समावेश आहे. सुनील सुर्यवंशी यांचे पार्थिव गुरूवारी मस्करवाडी येथे आणले जाणार आहे. सुनील सुर्यवंशी यांना एका वर्षाची मुलगी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या गावी नवीन घर बांधले होते. नवीन घराची वास्तुशांती आणि आपल्या चिमुकलीचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचा त्यांच्या कुटुंबियांचा मानस होता. पण याआधीच सुर्यवंशी कुटुंबियांकडे सुनील यांच्या निधनाची वार्ता धडकली आणि कुटुंबियांसह संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला.
मोदींनी रूग्णालयात जाऊन घेतली हणमंत आप्पांची भेट
३ फेब्रुवारीला सियाचीन रांगांत १९ हजार फूट उंचीवर १० भारतीय सैनिकांची तुकडी गस्त घालत असताना हिमस्खलन झाले. यात ही संपूर्ण दहा जवानांची तुकडी बर्फाच्या ढिगाऱयाखाली दाबले गेले. यानंतर बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तब्बल सहा दिवसांनी नऊ जवानांचे मृतदेह हातील लागले, तर एका जवानाला जीवंत बाहेर काढण्यात यश आले.