३८ जणांना उपशिक्षणाधिकारीपदी बढती
शालेय शिक्षण विभागातील ३८ कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता व गुणवत्तेनुसार उपशिक्षणाधिकारीपदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. हे सर्व अधिकारी ३० दिवसात संबंधित ठिकाणी रुजू व्हायचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. या अवधीत रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याने पदोन्नती नाकारली असल्याचे समजण्यात येईल व त्यांना पदोन्नतीचे कोणतेही लाभ देय राहणार नाही, असेही या पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर रूपये ९३००-३४८०० वेतनबॅंड अधिक रुपये ४८०० ग्रेड वेतन, अशा सुधारित वेतन संरचनेत ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार तात्पुरत्या स्वरूपात ३८ कर्मचाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात व्ही.एस.फडतरे, कोल्हापूर, सी.आर. काळे, कोल्हापूर, व्ही.एन. आळंगे, लातूर, एस.व्ही. बहाळे, अमरावती, अस्करी फातेमा शहनाज, औरंगाबाद, विजया थोरात, अमरावती, एस.के. चव्हाण, कोल्हापूर, पी.डी. डंभे, अमरावती, व्ही.एन. कांबळे, कोल्हापूर, व्ही.डब्ल्यू पडोळे, अमरावती, काझी मोईनोद्दीन, औरंगाबाद, पटेल मिनहास बेगम, औरंगाबाद, शेख नसीमोद्दीन, औरंगाबाद, पी.जे. शिंदे, कोल्हापूर, बी.एच. सरताळे, कोल्हापूर, बी.एस. जोशी, लातूर, पी.व्ही. जाधव, औरंगाबाद, एस.एम. नाईक, अमरावती, डी.आर. गुप्ता, औरंगाबाद, एस.बी. नागरे, औरंगाबाद, ए.आर. खोपडे, नागपूर, एम.एम. बावणे, नागपूर, साधना पिंपळकर, नागपूर, राजांदर कौर सिंध, मुंबई, ए.बी. वाडकर, कोल्हापूर, ए.बी.वांद्रे, कोल्हापूर, बी.डी. वैरागे, औरंगाबाद, जयश्री त्यागी, पुणे, एम.एल. कांबळे, औरंगाबाद, के.जी. खरात, अमरावती, मनुताई पखाले, अमरावती, सुनंदा मुळे, अमरावती, एस.एल. अहिरराव, नाशिक, व्ही.व्ही. माकोडे, औरंगाबाद, उमेश राठोड, नागपूर, जे.व्ही. काटे, नागपूर, व्ही.टी.इडपाते, अमरावती यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही पदोन्नती उच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या ८४५२/२००४ या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पदोन्नतीनंतर दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी ३० दिवसात रुजू व्हायचे असून तसे शिक्षण आयुक्त, पुणे यांना कळवायचे आहे.