आज अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबईचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शिवाजी पार्कवरील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मरणोत्सव समितीतर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर सुनिल प्रभु, आयुक्त सिताराम कुंटे, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मरणोत्सव समितीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे महपौरांच्या बंगल्यावर आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या संगीत कला संस्थेच्या कलाकारांनी देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन हे देखील उपस्थित होते.
दरवर्षी १९ फेब्रुवारीला राज्य सरकारतर्फे अधिकृतपणे शिवजयंती साजरी करण्यात येते. तर शिवसेना २४ मार्च रोजी शिवजयंती साजरी करते.