18 August 2017

News Flash

मध्यावधी निवडणूक झाल्यास शिवसैनिक वणव्याप्रमाणे पेटून उठेल: उद्धव ठाकरे

हिंमत असेल तर निवडणूक घेऊ दाखवावी, भाजपला आव्हान

मुंबई | Updated: June 19, 2017 8:26 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली असून या निवडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपतीपदावर मतांचे राजकारण नव्हे तर देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपला पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा करता येत नसेल तर समान नागरी कायदा कसा करणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

शिवसेनेचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्या (मंगळवारी) शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजपच्या नावावर चर्चा करु असे त्यांनी सांगितले. सीमा अशांत आहे, काश्मीर पेटलंय, गोरखा मुक्तीचे आंदोलन पुन्हा पेटले असून अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपला पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. पाठीत वार झाल्याने रक्तबंबाळ होऊनदेखील संकटाच्या प्रसंगी रक्तदान करतो तोच खरा शिवसैनिक असल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

मध्यावधी निवडणुकीची आम्हाला पर्वा नाही. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याची चिंता मला जास्त आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य वाचवण्याची शिवसेनेची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. मध्यावधी निवडणूक झाल्यास शिवसैनिक ठिणगी नव्हे तर वणव्याप्रमाणे पेटून उठेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन  दाखवावी. शिवरायांच्या भूमीत तुम्हाला गाडून तुमच्याच छातीवर भगवा फडकावून दाखवू असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले आहे. दरवेळी आपला विजयच होईल असा गैरसमज कोणी करु नये. आता काळ बदलला असून खचलेला शेतकरी रस्त्यावर उतरलाय अशी आठवणही त्यांनी भाजपला करुन दिली.

भारत कृषीप्रधान देश असून शिवसेना शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत सरकारला सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. बेळगावमध्ये कर्नाटक सरकार अत्याचार करत आहे. पण यावर कोणीही बोलत नाही. फक्त शिवसेनाच याविषयावर बोलतो. मराठी माणसाच्या मागे फक्त शिवसेना उभी राहिली असे त्यांनी सांगितले. बेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटक सरकारने मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत बघू नये असा इशाराही त्यांनी दिला. सर्वसामान्य हिंदू आणि मराठी माणसाच्या मागे उभे राहताना मी सत्तेची पर्वा करणार नाही असे त्यांनी सांगितले.

First Published on June 19, 2017 7:42 pm

Web Title: shivsena party chief uddhav thackeray speech 51 foundation day slams bjp ramnath kovind farmer issue
 1. A
  Anil Gudhekar
  Jun 20, 2017 at 7:47 am
  पेटल्यानंतर उठण्याची शक्यताच नाही ........राख होण्याची मात्र आहे
  Reply
 2. D
  dilip
  Jun 20, 2017 at 7:29 am
  Wanvya madhe shivsainik ani shivsena bhasmasat hoil
  Reply
 3. S
  Shriram
  Jun 20, 2017 at 7:16 am
  येड लागलं.
  Reply
 4. P
  Prashant
  Jun 20, 2017 at 4:46 am
  शिवसैनिक पेटून उठेल आणि उद्धटराव जातील परदेशात पर्यटनाला थंड हवा खायला .
  Reply
 5. S
  Satish
  Jun 19, 2017 at 11:40 pm
  भाजप कार्यकर्ते या वणव्यावर थुंकुन किंवा मुतून तो विझवतील.
  Reply
 6. K
  Kabir
  Jun 19, 2017 at 11:09 pm
  अहो उद्धवजी, आता कंटाळा आला हो, बालिश बहू बायकांत बडबडला असेच वाटते.
  Reply
 7. S
  sharad Joshi
  Jun 19, 2017 at 11:05 pm
  पोकळ बढाया! १० आमदार निवडून आले तर डोक्यावरून पाणी गेले.शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी चार पैसे खिशातले काढून दिले का?मातुश्री२ बांधायचे ऐवजी शेतकऱ्यांना मदत का करत नाही? बहुदा आदित्यचे लग्नाची तयारी असेल.डिड दमडी लायकी नसलेल्याला महाल आणि शेतकरी मरतो आहे.
  Reply
 8. P
  pravin
  Jun 19, 2017 at 10:45 pm
  ऊध्दव ठाकरे यांचे एकएक वकृत्व एैकून जुने जाणते शिवसैनिक धन्य हाेत असतील आणि मनात म्हणत कुठे आहे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना? प्रवीण म्हापणकर.
  Reply
 9. M
  MIlind Chitnis.
  Jun 19, 2017 at 10:29 pm
  Bapu please donate 1000 cr from your family asset all shiv Sainik will contribute 2000 cr collectively for Farmer's welfare. Dare to accept this challenge.
  Reply
 10. P
  Prashant
  Jun 19, 2017 at 10:10 pm
  शिवसैनिक पेटुन उठणार आणि उद्धटराव पर्यटनासाठी कुठेतरी परदेशात थंड हवा खायला जाणार .
  Reply
 11. उर्मिला.अशोक.शहा
  Jun 19, 2017 at 10:08 pm
  ववन्डे मातरम-बेडकाच्या विश्वाचे सेनापती सांगतील का महाराष्ट्र इलेक्शन वेळी सैनिक गारठले होते का?महाराष्ट्रात नागरी इलेक्शन झाल्या ,पंचायत आणि जिल्हा परिषद इलेक्शन झाल्या त्या वेळी सैनिक पेटवायला चिंध्या मिळाल्या नाहीत काय?तुमची औकात बघा आणि मग फुसक्या डरकाळ्या फोडा मुंबई महापालिके चे खड्डे पुरले का? पावसाळा जवळ आला आहे आपले काम बघा नकटे नाक केंद्राच्या राज्याच्या कारभारात खुपसू नका जनतेने तुमची औकात दाखवून दिली आहे मुसलमानांच्या तोंडात रोटी कोंबणारे त्याचा रोजा तोडणारे तुम्ही,विमान अधिकाऱ्याला चपले ने मारणारे तुम्ही उठ सुठ मुंबई बंद पडंनारे तुम्ही जैतापूर होऊ देणार नाही,समृद्धी होऊ देणार नाही असे करून मराठी तरुणांचये रोजगार हिरवणारे तुम्ही विश्वास पात्र कसे मतदार जनता या वाघाचे सोंग घेणाऱ्या पक्षा पासून नेत्या पासून सावध राहा मुंबईकरांनी चूक केली तुम्ही करू नका जा ग ते र हो
  Reply
 12. V
  Vijay
  Jun 19, 2017 at 10:07 pm
  मध्यावधी निवडणुk jhali tar senechi hya welela MNS sarkhi sthiti honar Uddhav rao vachal badbad kami kara aani lokanchi kaam kara
  Reply
 13. M
  milind
  Jun 19, 2017 at 9:42 pm
  हे भुक्कड खिशात राजीनामा घेऊन फिरणारे लोक, लोकांना असेच भुलवत झुलवत ठेवणार आणि सत्तेची ई मटकावणार, शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली अजून प्रत्यक्ष झाली नाही. मग हे सत्तापिपासू लोक सत्तेतून बाहेर का पडले नाहीत? "दलित" मुद्दा आला की याना जणू फेफरेच येतं. दिवंगत बाळ ठाकरेसुद्धा असेच दलित विरोधी राजकारण करत होते. मोहन भागवतना राष्ट्रपती करा असे म्हणताना यांची जीभ चाचरत नाही? तेव्हा विशिष्ट जातीचं आणि समाजाचं हित नसतं काय? मग आता काय आहे? शिवसेना हा मूर्खपणाचा अड्डा आहे.आज एक उद्या एक अशी यांची भूमिका आहे.
  Reply
 14. A
  Ajitdada
  Jun 19, 2017 at 9:07 pm
  Arey hey kaai, kaal baap lek fulancha gooch det hotey tar aaj chaataadawar basnyachi bhasha karat aahet? kiti aparipakvata !
  Reply
 15. P
  Parimal Gole
  Jun 19, 2017 at 8:35 pm
  उद्धव साहेब मी एके काळचा कट्टर शिव सैनिक पण आता तुमच्या बुद्धि ची किव येते राव. परत तुम्हाला मत देऊ अशा भ्रमात राहू नका. फुकटची ी मिळाली ती नीट साम्भाळा
  Reply
 16. S
  sushil
  Jun 19, 2017 at 8:16 pm
  a hai ye yala vichara g hayat ke chuffer lokana rastyawar ka aanl Mumbai Marathi mansa war anyay karata ter garib shetkarchya talu warch loni khaun satta karaychi aahe yala
  Reply
 17. L
  lai bhari
  Jun 19, 2017 at 8:05 pm
  लायकी किती आणि बोलतो किती...
  Reply
 18. Load More Comments