मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड येथील गांधारपाले लेण्यांजवळ झालेल्या विचित्र अपघातात १ जण ठार, तर ४५ जण जखमी झाले. जखमींमधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी एस.टी. महामंडळाच्या बसेसची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. बसेसना वाचवण्याच्या प्रयत्नात याच वेळी तिथून जाणारा ज्वालाग्राही अ‍ॅसिड टँकरही उलटला आणि त्यातून अ‍ॅसिड गळती सुरू झाल्याने महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.mh04
गांधारपाले येथील वळणावर ठाण्याकडून येणारी ठाणे-चिपळूण एस.टी. गाडीआणि महाडकडून जाणाऱ्या गुजरकोंड-भाईंदर एस.टी.ला समोरासमोर धडकली. ज्वालाग्राही अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडवाहू टँकरला मागे टाकत असतानाच हा अपघात झाला. दोन्ही एस.टी. बसेसना वाचवण्याच्या प्रयत्नात या वेळी टँकर रस्त्याच्या बाजूला कलंडला आणि त्यातून अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडची गळती सुरू झाली.   धम्डकेत माणगावचा प्रवासी सुभाष नारायण िशदे हा जागीच ठार झाला, तर अन्य ४५ प्रवासी जखमी झाले.

st2

Satara, four wheeler hit bike,
सातारा : मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
bus-two wheeler accident, Grand daughter died,
बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम
one dead in Accident on JNPT Palaspe National Highway
जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू