वर्षभरापासून रखडलेल्या पगारासाठी धरणे आंदोलनात बसलेल्या अतिरिक्त शिक्षकांपकी हिरामण भंडाणे या शिक्षकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शनिवारी पहाटे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे वृत्त कळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मृतदेह थेट जिल्हा परिषदेसमोर आंदोलनस्थळी आणून ठेवला. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या अनास्थेचा बळी गेल्यामुळे त्यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.