हिंदी चित्रपटांचा जुना फॉम्र्युला आता बाद ठरला आहे हे सांगायचीच गरज नाही. परंतु, काही काही चित्रपट हे विधान पुन:पुन्हा सांगण्यासाठी बनलेले असतात. ‘बरखा’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे. जुना फॉम्र्युला नव्या बाटलीत आणताना मात्र लेखक-दिग्दर्शकाने निराळाच मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो rv14पूर्णपणे फसला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी श्रवणीय संगीत सोडले तर हा चित्रपट अभिनय, कथानक कशाच्याच बाबतीत प्रेक्षकाला भिडत नाही.  
१९५५-६० च्या दशकात हिंदी चित्रपटाचा नायक फक्त प्रेमात पडण्यासाठीच आपल्या एका विनोदी मित्रासोबत थंड हवेच्या ठिकाणी जात असे. थंड हवेच्या ठिकाणी गेल्यानंतर अचानक त्याला एक गावरान सुंदरी दिसे आणि तो तिच्या प्रेमात पडत असे. त्याचे उच्चभ्रू घराणे ‘खानदान की इज्जत मिट्टी में मिल जाएगी’ म्हणत नायक-नायिकेच्या प्रेमाला नकार देत. हाच फॉम्र्युला थोडा निराळा मुलामा देत लेखक-दिग्दर्शकाने ‘बरखा’ या चित्रपटात आणला आहे.
बरखा ही एक अशी तरुणी आहे जिचे नशीब फुटके वगैरे आहे. हिंदी चित्रपटाची नायिका पूर्वी अशीच असायची. तिची एक कथाच आहे. परिस्थितीवश हिमाचल प्रदेशमधील खेडय़ातून पोटापाण्यासाठी बरखा मुंबईत बारबाला बनते. त्यात तिला एक तरुण लग्नाची मागणी घालतो आणि लग्नही करतो. परंतु, पोलीस पकडतात तेव्हा मात्र तो आपण बरखा नावाच्या तरुणीला ओळखतही नाही असे सांगतो. एकीकडे बरखा उद्ध्वस्त होते. हिमाचल प्रदेशमध्ये एक नजरेत तिच्यावर प्रेम जडलेला तरुण जो आपल्या चित्रपटाचा नायक आहे तो तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो आणि वास्तव समजूनही तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार असतो. परंतु, एक रहस्य बरखाला समजते आणि ती नायकाला सोडून निघून जाते.  एका बारबालेशी लग्न करणे ‘ये प्यार नही नादानी है’ असे नायकाची आई त्याला सांगते. पण आपला मजनू बरखाच्या प्रेमात पागल वगैरे झालेला असतो असा सगळा तद्दन जुनाट हिंदी चित्रपटातील चावून चोथा झालेले नाटय़ दाखविण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. मुख्य म्हणजे यातील एकाही प्रमुख कलावंताचा अभिनय प्रेक्षकाला भिडत नाही त्यामुळे त्यातील नाटय़, घटना-प्रसंगांमध्ये प्रेक्षक गुंतत नाही.
बरखा ही भूमिका सारा लॉरेन हिने साकारली असून बडे बाप का बेटा असलेला नायक ताहा शहा या पडद्यावरील नवोदित कलावंताने साकारला आहे. मूळचा टीव्हीवरील कलावंत असल्यामुळे पहिल्याच चित्रपटात ताहा शहासारख्या कलावंताकडून अभिनयाची अपेक्षा वगैरे करण्याची गरजच नाही.
आपल्याशी लग्नाचे नाटक करून फसविणारा पुरुष आणि तरीसुद्धा आपल्यावर नितांत प्रेम करणारा नायक बरखाला भेटतो एवढेच कथेतील नावीन्य म्हणता येईल. परंतु, अशा सत्शील नायकाच्या आयुष्याची जोडीदार बनण्यापेक्षा निघून गेलेले बरे असा विचार नायिका करते हेच या चित्रपटाचे नावीन्य म्हणता येऊ शकेल. लेखक-दिग्दर्शकाला दाद द्यायला हवी ती ही सगळी गोष्ट एका पुस्तकामार्फत पुन्हा एकदा नायकासमोर येते आणि नायक-नायिकेचा शोध घेतो अशा पद्धतीने चित्रपट उलगडला आहे. उत्तम चित्रीकरण आणि उत्तम संकलन असले तरी सर्वच प्रमुख कलावंतांची अभिनयशून्यता पाहून प्रेक्षकाला उबग न आला तरच नवल. गाणी आणि संगीत श्रवणीय आहे एवढीच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. बाकी सारे पुन:पुन्हा पाहिलेलेच या चित्रपटात पाहावे लागते.

बरखा
निर्माते – शबाना हाश्मी
लेखक-दिग्दर्शक – शदाब मिर्झा
संगीत – अमजद-नदीम
छायालेखन – मुजाहिद रझा
संकलन – मयुरेश सावंत
कलावंत – सारा लॉरेन, ताहा शहा, प्रियांशू चटर्जी, श्वेता पंडित, पुनित इस्सार, आशिष रॉय व अन्य.

South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या