बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आता छोट्या पडद्यावर अवतरण्याची चर्चा आहे. टेलिव्हिजनवरील बहुचर्चित ‘नच बलिए’ या ‘डान्स रिआलिटी शो’मध्ये परिक्षक म्हणून करिनाला विचारण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र, करिनाला सध्या चित्रपटांवरच लक्ष केंद्रीत करायचे असून सध्या तरी तिचा छोट्या पडद्यावर येण्याचा विचार नसल्याचे करिनाच्या व्यवस्थापकीय टीममधील एकाने सांगितले. निर्मात्या एकता कपूर या ‘नच बलिए’च्या नव्या पर्वासाठी चौथ्या परिक्षकाच्या शोधात असून अभिनेत्री करिना कपूरला करारबद्ध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, याआधी करिनाची बहिण करिश्माने या रिआलिटी डान्स शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले आहे.तर, करिनाने देखील अनेकवेळा आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.