स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मेरी कोम’ या चित्रपटाने सवरेत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळविला आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने कांस्यपदक मिळविले आहे. भारतीय महिला बॉक्सरपटू मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
स्वीडन येथे आयोजित स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (ज्युनिअर) ‘मेरी कोम’ची निवड झाली होती. महोत्सवातील सर्वोच्च बहुमान मिळाला असून निवड समितीमधील ९ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांनी ही निवड केली आहे. चित्रपट सादरीकरणाच्या वेळी दिग्दर्शक ओमंग कुमार उपस्थित होते. पुढील महिन्यात स्वीडन येथे आयोजित भारतीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट भारतीय दूतावासातर्फे दाखविण्यात येणार आहे.