झोया अख्तरच्या आगामी ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील एक गाणे बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आल्याचे समजते. आपल्या आवाजात गाणे संगीतबद्ध करण्याची प्रियांकाची ही काही पहिली वेळ नाही. याआधी प्रियांका चोप्राच्या ‘इन माय सिटी’ या गाण्याला आणि ‘एक्झॉटिक’ अल्बमला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच प्रियांकाच्या ‘आय कान्ट मेक यु लव्ह मी’ या गाण्यालाही चांगले यश मिळाले आहे.
झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’चा फर्स्ट लूक
विशेष म्हणजे, ‘दिल धडकने दो’ चित्रपटाचे शिर्षक गीत प्रियांकाने गायले असून हे गाणे चित्रपटाच्या शेवटी दाखवले जाणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. याआधी अभिनेता आणि गायक फरहान अख्तरने देखील झोयाच्या या चित्रपटातील एका गाण्याला आवाज दिल्याची माहिती समोर आली होती. पुढील वर्षाच्या जून महिन्यात प्रदर्शित होणाऱया या चित्रपटात रणवीर सिंग, फरहान अख्तर, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, शेफाली शहा आणि अनुष्का शर्मा यांच्या भूमिका आहेत.