पोलीस अत्यंत कठीण आयुष्य जगत असतात त्यावर चित्रपट केल्याने इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे रोहीत शेट्टी महिला पोलीस अधिकाऱयावर आधारीत असा सिंघम चित्रपटाचीही निर्मिती करेल अशी आशा बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरला आहे.
पाहाः अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’चा ट्रेलर
करिनाने दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याआधीच्या ‘सिंघम’ चित्रपटाला तिकीटबारीवर चांगले यश प्राप्त झाले होते. त्यामुळे ‘सिंघम रिटर्न्स’ देखील बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या एका प्रमोशन कार्यक्रमात करिना म्हणाली की, मी आतापर्यंत अनेक पोलीस अधिकाऱयांना भेटली आहे परंतु, महिला पोलीस अधिकाऱयाची भेट मला घ्यायची आहे आणि सिंघम रिटर्न्स चित्रपट रोहीत शेट्टी महिला पोलीस अधिकाऱयांना दाखविण्यासाठी नक्की प्रयत्न करेल असे मला वाटते. तसेच पुढील ‘सिंघम’ चित्रपट रोहीतने महिला पोलीस अधिकाऱयावर आधारित करावा अशी आशा आहे. असेही ते म्हणाली.
बाजीराव सिंघम आता मुंबईचा फौजदार
दरम्यान, या प्रमोशनल कार्यक्रमाला रॅपर यो यो हनी सिंग देखील उपस्थित होता. त्याबद्दल बोलताना करिना म्हणाली की, “मी हनी सिंगच्या गाण्यांची चाहती आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक होते. याआधी मी काम केलेल्या कोणत्याही चित्रपटांत हनी सिंगची गाणी नव्हती. त्याच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि सिंघम रिटर्न्समधील हनी सिंगचे गाणे नक्की ब्लॉकबास्टर ठरेल यात वाद नाही.” असेही करिना म्हणाली.
‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटावर बंदीचे सावट