लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच पसंती मिळवणारे ‘पॉप़ॉय’ हे कार्टूनपात्र पुन्हा सर्वांच्या भेटीला येत आहे. मात्र, यावेळी तो येतोय अॅनिमेटेड रुपात. सोनी पिक्चर्स अॅनिमेशनने नुकताच ‘पॉपॉय’चा स्निक पीक प्रदर्शित केला. सध्या या चित्रपटावर काम सुरु आहे.
‘पॉपॉय’चे दिग्दर्शक गेन्डी टॅरटाकॉव्स्की यांनी सदर कार्टूनबद्दलचे प्रेम आणि अमेरिकेतील कार्टून चाहत्यांसोबतचा अनुभव सदर व्हिडिओत सांगितला आहे. ते म्हणतात की, सदर व्हिडिओ हा पॉपॉय चित्रपटाचा ट्रेलर नाही आणि त्याचा चित्रपटाच्या कोणत्याही दृश्याशीही संबंध नाही. हा केवळ एक नमुना जो आम्ही अॅनिमेटेड ‘पॉपॉय’ कसा असावा याकरिता तयार केला आहे. यात देण्यात आलेले आवाजही तात्पुरते आहेत.
छोट्या कार्टूनप्रेमींना ‘पॉपॉय’वरील अॅनिमेटेड चित्रपट लवकरच पाहता येईल.