बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुप्रतिक्षीत ‘मेरी कोम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याआधी चित्रपटाच्या पोस्टर्स आणि टीझरमधून या चित्रपटासाठी प्रियांकाने भरपूर मेहनत घेतल्याचे पहायला मिळाले.
पाहा ‘मेरी कोम’ प्रियांकाचा टीझर
मुष्ठियोद्धा मेरी कोमच्या चरित्रपटावरील या चित्रपटात प्रियंकाने आपल्या शरीरयष्टीत ‘मेरी कोम’ लूक आणण्याचा कष्टाळू प्रयत्न केल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.
फर्स्ट लूक: ‘मेरी कोम’ प्रियांका चोप्रा
तसेच ऑलिम्पिक चॅम्पियन मेरी कोमच्या वैयक्तीक जीवनात निर्माण झालेले अडथळे आणि त्यावर मात करत तिने आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केलेले परिश्रम यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे पण, त्यासोबतच मेरी कोम प्रेमात पडून लग्नबंधनात अडकते आणि जुळ्यांना जन्म देते येथेच कथा संपत नाही. त्यानंतरही जगाला समोरे जाण्याची तयारी आणि आई झाल्यानंतरही मुष्ठीयोद्धा स्पर्धेत खेळण्यासाठीची धडपड याबद्दलची मेरी कोमची कहाणी प्रेरणादायी ठरणारी आहे.