बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय काही दिवसांपूर्वी अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसला. या ट्रिपचे काही फोटो त्याने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या फोटोमध्ये त्याच्यासोबत प्रौढ सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री केडेन क्रॉसही दिसते. तिच्यासोबतच्या फोटोंमुळेच महाक्षयचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ट्रिप दरम्यान त्याने इतर सेलिब्रिटींसोबतचे फोटोही शेअर केले.

https://www.instagram.com/p/BZa8gQbhg3z/

https://www.instagram.com/p/BZuTuOghpBH/

महाक्षय लवकरच ‘गामा पेहलवान’ या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. या मालिकेची निर्मिती सलमान खान करणार आहे. २००८ मध्ये ‘जिम्मी’ या सिनेमातून महाक्षयने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पण सलग ५ सिनेमे अपयशी ठरल्यानंतर त्याला नंतर सिनेमे मिळणे बंद झाले.
५२ भागांची ‘गामा पेहलवान’ ही मालिका इतर मालिकांप्रमाणे नसेल. या मालिकेचे प्रसारण विकेण्डला केले जाणार आहे. शनिवार- रविवार या दोन दिवसांमध्ये एक- एक तास ही मालिका दाखण्यात येईल.

https://www.instagram.com/p/BZkJSdUhVmr/

https://www.instagram.com/p/BZPT8jdhAKw/

महाक्षय नेहमीच आपल्या फिटनेसच्या बाबतीत सजग असतो. तो नेहमीच त्याचे जीममधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. मोठ्या पडद्यावर जरी महाक्षयला आपले स्थान तयार करता आले नसले तरी आता तो छोट्या पडद्यावर आपले नाणे खणखणीत वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे.

https://www.instagram.com/p/BZo4cWvh9qO/