राखी सावंतला चर्चेत येण्यासाठी कोणतही कारण पुरेसं असतं. काही दिवसांपूर्वीच मला राष्ट्रपती करा असं मोठ्या तोऱ्यात सांगणारी राखी आता अंबानी कुटुंबियांकडून मदत मागत आहे. तिने फेसबुक व्हिडिओतून ताहिर नावाच्या एका मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन अंबानी कुटुंबियांना केलं आहे. एजाज खाननेसुद्धा काही दिवसांपूर्वी या मुलाच्या उपचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली होती. त्याचच समर्थन करत राखीने हा फेसबुक व्हिडिओ शेअर केला आहे.

कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर ती व्हायरल होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा वेळसुद्धा पुरेसा असतो. असंच काहीसं राखीच्या या व्हिडिओबाबतही घडल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर जवळपास २५ हजाराहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

ताहिरच्या नावे मदत मागताना राखीने अंबानी कुटुंबियांवरही निशाणा साधला आहे. कमी पैशांचं कारण देत कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ताहिरवर उपचार करण्यात येत नसल्यामुळेच एजाज आणि राखीने हे व्हिडिओ पोस्ट केले आहे. मुख्य म्हणजे आपण आतापर्यंत केलेली पापं धुवून टाकण्यासाठी तरी निदान ताहिरची मदत करा असं राखी या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड 

दरम्यान, राखी सावंत आणि तिची अवाजवी वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतच योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात एका कार्यक्रमात तिला राष्ट्रपती पदासाठी तुला कोण योग्य वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताच राखीने थेट स्वत:चच नाव पुढे करत आपण या पदासाठी किती योग्य आहोत हे पटवून देण्यास सुरुवात केली. तिचं हे विधान ऐकताच अनेकांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे राखीचा काही नेम नाही असंच म्हणायला हवं.

वाचा : .. हे आहेत ऑनस्क्रिन आई-वडिलांनाच डेट करणारे सेलिब्रिटी