गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. शाहिद कपूर-मीरा राजपूत, करिना कपूर खान-सैफ अली खान, शब्बीर अहलुवालिया-कांची कौर, गीता बसरा-हरभजन सिंग या सेलिब्रिटींच्या घरी गोंडस बाळांनी जन्म घेतला. त्यानंतर आता यावर्षीही काही सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोहा अली खान ही गरोदर असल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल ही गरोदर असल्याचे कळते. याआधी ईशाची बहिण आहाना देओल हिने २०१५ साली एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे आता पुन्हा एकदा आजी-आजोबा होणार आहेत. ईशाने २९ जून २०१२ रोजी व्यावसायिक भारत तख्तानी याच्याशी लग्न केले. लहानपणापासून एकमेकांना ओळखणाऱ्या ईशा आणि भारतने वेगवेगळ्या करिअरची निवड केल्यामुळे ते एकमेकांपासून दूर झालेले. पण, ‘टेल मी ओ खुदा’च्या शूटदरम्यान ईशा आणि भारतची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांच्यातील प्रेम बहरले. आहानानंतर ईशानेही गोड बातमी द्यावी अशी हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस

सोहा अली खान आणि कुणाल खेमू हेदेखील आई-बाबा होणार असून स्वतः कुणालनेच ही बातमी ‘पिंकविला’ वेबसाइटला सांगितली. पहिल्यांदाच आई-बाबा होणारे सोहा आणि कुणाल खेमु सध्या खूप आनंदात आहेत. करिनाने तैमुरला जन्म दिल्यानंतर सोहानेसुद्धा गोड बातमी दिल्याने खान कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

दरम्यान, मॉडेल-अभिनेत्री लिसा हेडन हीदेखील गरोदर असून लवकरच ती गोड बातमी देणार आहे. इन्स्टाग्रामवर बेबी बम्पसोबतचा फोटो शेअर करून लिसाने तिचा आनंद व्यक्त केला होता. सोशल मीडियावर सक्रिय असलेले लिसा तिचे वरचेवर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना स्वतःबद्दल माहिती देत असते.