बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिचा आगामी सिनेमा ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये कमालिची व्यग्र आहे. इम्तियाझ अली दिग्दर्शित या सिनेमात अनुष्का एका गुजराती मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. अनुष्काने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलंय आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना होते.

…म्हणून रिचा शिकतेय मराठीची बाराखडी

जब हॅरी मेट सेजल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिने अभिनेत्री होण्याचा निर्णय कसा घेतला यामागची कथा सांगितली. मी बिकानेरमध्ये असताना आई- बाबांसोबत जब वी मेट सिनेमा पाहायला गेले होते. या सिनेमात करिनाने साकारलेली गीतची भूमिका पाहून माझ्या मनात अभिनेत्री होण्याचा विचार आला. गीतला पाहून आपणही सिनेमांत काम करावं, असं त्याक्षणी वाटून गेलं,’ असे अनुष्काने सांगितले. एकंदरीत काय तर करिनाच्या त्या भूमिकेमुळे बॉलिवूडला एक गुणी अभिनेत्री मिळाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाकडून अनुष्काला फार अपेक्षा आहेत. इम्तियाझसोबत काम करण्याची ती अनेक वर्षांपासून वाट पाहत होती. इम्तियाझने तिला ऑफर केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात गुजराती मुलीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली. गुजराती भाषा बोलतानाचा हेल जाणून घेण्यासाठी तिने फार मेहनत घेतली. तिने एका गुजराती शिक्षकाचीही मदत घेतली.

‘विनोदाचा ‘मीटर’ पाळावाच लागतो’

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. अनुष्काला तिची अंगठी मिळते का, अंगठी शोधण्याच्या या प्रयत्नात ती शाहरूखच्या प्रेमात कशी पडते या सर्व प्रश्नांची उत्तरं ४ ऑगस्टला चित्रपटगृहात मिळतील. मिनी ट्रेलर्स असो किंवा चाहत्यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या शहरांत फिरणे असो शाहरूख आणि अनुष्काने प्रमोशनसाठी अनोखे फंडे आजमावले. ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’नंतर दोघांचा एकत्रित हा तिसरा सिनेमा आहे.