‘वॉन्टेड’ चित्रपटामध्ये सलमान खानसोबत लक्षवेधी भूमिका साकारणारी आणि आपल्या सौंदर्याने तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी आएशा टोकियाच्या सौंदर्यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तिने प्लॅस्टिक सर्जरी करुन सौंदर्य खुलविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर नेटीझन्स या अभिनेत्रीवर तोंडसुख घेताना दिसते. सोशल मीडियावरुन खिल्ली उडविणाऱ्या लोकांना न डगमगता आएशाने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावरुन उमटणाऱ्या उलट सुलट प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आएशाने देखील सोशल मीडियाचा आधार घेतला. सध्या आपण कसे दिसतो त्याचा अभिमान बाळगायला हवा, सध्याच्या बदलत्या जगात मला प्रश्न विचारण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे सांगत तिने नेटीझन्सला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मी स्वत:वर प्रेम करते, तुम्हीही स्वत:वर प्रेम करा, असा सल्ला देत आएशाने सौंदर्याची खिल्ली उडविणाऱ्यांचा समाचार घेतला.

आएशा टीकाकारांना उत्तर देताना म्हणते की, दुसरे लोक काय म्हणतात यात काही अर्थ नाही, तर आपल्या विचारांचे मालक आपण असायला हवे. याआधी ब्रेस्ट सर्जरी केलेल्या आएशाने एकाहून अधिकवेळा प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे दिसून आले होते. तिच्या चेहऱ्यावरील हा भाव कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर ती थट्टेचा विषय बनली होती. ती सोशल मीडियावर फास सक्रीय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी तिचे नवनवीन फोटो सतत पोस्ट करत असते. आधीच्या चेहऱ्यापेक्षा तिचा आताचा चेहरा वेगळा दिसत आहे. तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो यात फार फरक पडल्याचे जाणवत असल्यामुळे तिने केलेल्या प्लॅस्टिक सर्जरीवर प्रश्न उपस्थित करत तिच्या सौंदर्यावर चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

आएशाच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी सांगायचे तर तिने ‘टारझनः द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आएशा टाकियाच्या सौंदऱ्यावर अनेकजण घायाळ होते. २००९ मध्ये आएशाने फरहान आझमी याच्याशी विवाह केला होता. फरहान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. लग्नानंतर आएशा दुरावली होती. २०१३ मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. मुलाचे नाव मिकाइल असे ठेवले होते. २००४ मध्ये ‘टारझन द वंडर कार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आएशाने शाहिद कपूरबरोबर ‘दिल मांगे मोर’, अभय देओल बरोबर ‘सोचा ना था’ तसेच २००९ मध्ये सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटातही ती दिसली होती. ती दिसली होती. तिचा आतापर्यंतचा शेवटचा सिनेमा ‘आप के लिए हम’ २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता.