‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने ज्यावेळी ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘क्वांटिको’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडत प्रियांकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर प्रियांकासुद्धा हॉलिवूडपटात झळकणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण, ‘बेवॉच’च्या याआधी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमुळे मात्र अनेकांचाच हिरमोड झाला. ड्वेन जॉन्सन, झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बेवॉच’च्या ट्रेलरमध्ये प्रियांका न दिसल्यामुळे बऱ्याचजणांचा हिरमोड झाला होता. मात्र, आता प्रियाकांच्या चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण झाली आहे.

ड्वेन जॉन्सनने त्याच्या ट्विटवर अकाऊंटवरून ‘बेवॉच’चा नवा ट्रेलर प्रसिद्ध केला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियांका आणि ड्वेनमधील खोडकर संवाद आणि या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. ड्वेनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या ट्रेलर ट्विट करत त्यासोबत प्रियांकाला उद्देशून कॅप्शनही लिहिलं आहे. ‘पीसी’ या चित्रपटामध्ये खलनायकी भूमिकेत दिसणार असल्यामुळे तिला इशारा देणारे ट्विट ड्वेनने केलं आहे. याशिवाय, त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही ट्रेलरमधील काही व्हिडिओ आणि चित्रपटाचे फोटो शेअर केले आहेत.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..