सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका मर्लिन मन्रो ही एक गाजलेली अभिनेत्री होती. मर्लिनचा जन्म १ जून १९२६ मध्ये झाला होता. तर ५ ऑगस्ट १९६२ ला ३६ वर्षिय मर्लिनचा धक्कादायक मृत्यू झाला. मृत्यू समयी ती फक्त ३६ वर्षांची होती. एवढ्या कमी वयात नावारुपाला आलेल्या मर्लिन एवढी लोकप्रियता कोणत्याही अभिनेत्रीला मिळाली नसेल. मर्लिन हॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री होती, जिच्याकडे माणसं आपसूक ओढली जायची. पण तिच्या आसपास राहणं फारच कमी लोकांच्या नशिबी होतं. जगभरात तिचे चाहते होते, ज्यांची तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी होती.

बाहेरच्या जगाला मर्लिनचं आयुष्य प्रसिद्धी, पैसा यांनी भरपूर असं सुखी समाधानी वाटत असलं तरी वास्तवात ते तसं नव्हतं. आपल्या संपूर्ण आयुष्यात ती खऱ्या प्रेमाच्या शोधात होती. तिला प्रेमात अनेकांनी धोकाच दिला. मर्लिनची चर्चा एवढी होती की तिचं नाव अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कॅनेडींपासून ते गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबॉल खेळाडू जो डिमॅगियो यांच्यासोबत जोडले गेले होते. यांच्या व्यतिरिक्तही अनेक व्यक्तिंसोबत तिचे नाव जोडले गेले होते. तिच्या आयुष्याशी निगडीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने तीन वेळा लग्न केले होते. पण तिचे एकही लग्न शेवटपर्यंत टिकले नाही. याचं तिला शेवटपर्यंत वाईट वाटलं होतं.

तिसऱ्यांदा या अभिनेत्रीच्या मृत्युची अफवा सोशल मीडियावर झाली व्हायरल

‘मी कोणाची तरी बायको होईन या संकल्पनेनेच घाबरायचे. कारण मला माहित होतं की कोणीही दुसऱ्य व्यक्तीवर नितांत प्रेम करू शकत नाही जेवढं तो स्वतःवर करतो. त्यामुळे उद्यापासून मी आता माझा सांभाळ करणार आहे. हीच माझ्या आयुष्याची जमा पूंजी आहे. आधीही असंच होतं आणि आजही हेच खरं आहे,’ असं तिने एकदा लिहून ठेवले होते. मर्लिनला जेवण बनवायला फार आवडायचे. त्यावेळी मर्लिनचा मृत्यूही चर्चेचा विषय बनला होता. मर्लिन मन्रोच्या काही गाजलेल्या फोटोंवर टाकलेला हा एक प्रकाश…

merlyn-1

merlyn-1-jpg2_

merlyn-2

merlyn-3

merlyn-4

merlyn-5

merlyn-6

merlyn-7

merlyn-8

merlyn-9

merlyn-10

merlyn-11

merlyn-12

merlyn-13

merlyn-14

merlyn-15

merlyn-17

merlyn-18