संजय दत्तच्या चाहत्यांना त्याच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आता निर्मात्यांनी या सिनेमातील सनी लिओनीचे ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ हे आकर्षक गाणे प्रदर्शित केले आहे. सचिन जिगरने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. हे गाणं ऐकताना लिसा हेडनच्या ‘मनाली ट्रान्स’ गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पब किंवा क्लबमध्ये हे गाणं चांगलंच गाजेल यात काही शंका नाही. गणेश आचार्यने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्यात सनी एका बारमध्ये नृत्य करताना दिसतेय. शरद केळकर आपल्या मित्रांसोबत बारमध्ये गेला असता तिथे सनी डान्स करताना दाखवण्यात आली आहे.

…तर १४ वर्षांपूर्वीच बालिका वधूमध्ये दिसले असते रणबीर- आलिया

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

‘भूमी’ सिनेमात शरदने नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्यामुळेच कथानकाला एक वेगळं वळण मिळतं. साधं आयुष्य जगणाऱ्या बाप- लेकीच्या आयुष्यात शरदमुळे वादळ येतं. आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संजय सूड उगवण्याचा निर्णय घेतो.
सनीचं हे गाणं नेहा कक्कर, बेनी दयाल, ब्रिजेश शांडिल्य आणि बादशाहने गायले आहे. गाण्याचे बोल प्रिया सरैया आणि बादशाहने लिहिले आहेत. संजय दत्त आणि अदिती राव हैदरी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. गाण्याच्या चित्रीकरणाआधी सनीने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,’मी या गाण्यात गणेश आणि ओमंग सर यांच्यासोबत काम करत आहे. नृत्याच्या तालमीला सुरूवात झाली आहे, गणेश सरांनी या गाण्यात मला काही कठीण स्टेप्स दिल्या आहेत.’

सनी पुढे म्हणाली की, ‘या स्टेप्स करण्यासाठी मी माझ्यापरिने पूर्ण प्रयत्न करत आहे. या गाण्यात माझा लूक पूर्ण वेगळा आहे. मी याआधी अशा लूकमध्ये कधीच दिसले नव्हते. तरुणांना हे गाणं आवडेल अशी मला आशा आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यावर अनेकजण यातील स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करतील.’