बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या वाटेला चांगल्या भूमिका येत नाहीत, अशी तक्रार करण्याचे दिवस गेले. पण आता ‘अनारकली ऑफ आराह’, ‘फिल्लौरी’, ‘नाम शबाना’ आणि ‘बेगम जान’ या स्त्रीप्रधान सिनेमांकडे एक नजर टाकली तर सिनेसृष्टीतली ही परिस्थिती बदलल्याचे दिसते.
बॉलिवूडमध्ये असा एक काळ होता जेव्हा निर्माते अभिनेत्रींना त्यांच्या सिनेमात फक्त ग्लॅमर आणण्यासाठी घ्यायचे. पण आता निर्माते स्वतः उत्तम संदेश असलेले स्त्रीप्रधान सिनेमा काढण्याकडे भर देत आहेत.

swara bhaskar
स्वरा भास्कर

अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांच्या ‘पिंक’ या सिनेमात महिलांना गृहित धरु नका हा संदेश देण्यात आला होता. अनारकली…मध्येही स्वरा याच धाटणीचा संदेश देताना दिसत आहे. ‘अनारकली ऑफ आराह’मध्ये स्वरा भास्करची मुख्य भूमिका आहे.

 

anushka-sharma

स्वराच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध भूमिका अनुष्का ‘फिल्लौरी’मध्ये करताना दिसत आहे. काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्नशीर असलेली अनुष्का या सिनेमात सर्वांचं लक्ष वेधून घेते.

 

'नाम शबाना' सिनेमातील एक दृश्य
‘नाम शबाना’ सिनेमातील एक दृश्य

‘नाम शबाना’मध्ये तापसी पुन्हा एकदा नवीन रुपात दिसत आहे. अक्षय कुमारच्या ‘बेबी’ सिनेमाच्याही आधी या सिनेमाची बांधणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सिनेमात अक्षय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

 

begum-jaan-7594

‘बेगम जान’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विद्या बालनवरुन नजर हटत नाही. तिच्या दमदार अभिनयाचा पुनःप्रत्यय हा ट्रेलर पाहताना येतो. देहव्यापार करणाऱ्या एका कुंटणखान्याच्या मालकिणीची व्यक्तिरेखा विद्याने या सिनेमात साकारली आहे.