करण जोहर दिग्दर्शित बऱ्याच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. कुटुंबाचं महत्त्वं, प्रेम, मोठ्यांचा आदर, विनोदबुद्धी अशा अनेक गोष्टींची मांडणी करत करणने त्याचे चित्रपट प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. अमिताभ- जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर, फरिदा जलाल अशी तगदी स्टार कास्ट घेत करणने एका उच्चभ्रू कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. सर्वच बाबतीत या चित्रपटाला प्रेक्षकांनी दाद दिली होती. शाहरुख- काजोलच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला साजेशी गाणी आणि सहकलाकारांची उत्तम साथ यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले होते.

या चित्रपटात बालकलाकारांच्या भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरल्या. मग ती काजोलच्या लहान बहिणीची भूमिका साकारलेली मालविका राज असो, शाहरुखच्या लहान भावाच्या म्हणजेच ‘लड्डू’च्या भूमिकेत झळकलेला कविश मजुमदार असो किंवा मग शाहरुख- काजोलच्या मुलाची म्हणजेच ‘क्रिश रायचंद’ची भूमिका साकारणारा जिब्रान खान असो. प्रत्येक बालकलाकाराने त्यांना दिलेल्या भूमिकेला न्याय दिल्याचं पाहायला मिळालं. त्यातही क्रिशला अनेकांची पसंती मिळाली होती.

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई

परदेशात भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक जपण्यासाठी सतत तगादा लावलेल्या आईला कसं आनंदी ठेवायचं हे या चिमुकल्या ‘क्रिश’ला चांगलच ठाऊक होतं. शालेय कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत गाऊन आपल्या देशावर आणि आईवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची त्याची आगळीवेगळी पद्धत आजही अनेकांच्याच लक्षात आहे. हा क्रिश आता चांगलाच मोठा झाला असून दिवसागणिक त्याच्या सोशल मीडियावर फॉलोअर्सचा आकडा वाढत जातोय. विविध माध्यमांच्या आधारे आज कोणत्याही कलाकाराची माहिती मिळवण सोपं झालं असल्यामुळे ‘कभी खुशी कभी गम’मधील या क्रिशविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांनीच या माध्यमांची मदत घेतली. जिब्रान मॉडेलिंग विश्वात सक्रिय असून, तो डान्स इन्स्ट्रक्टरही आहे. अभिनय, मॉडेलिंग आणि नृत्याव्यतिरिक्त शारीरिक स्वास्थ्य जपण्याकडेही त्याचा कल आहे. याचा प्रत्यय त्याचे जिममधील काही फोटो पाहून येतोच.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावरकडून जिब्रानने नृत्याचे धडे गिरवले असून, आता तो त्याच्या सहायकाच्या भूमिकेतही दिसतो. इतकच नव्हे, तर त्याची स्वत:ची डान्स अकॅडमी असून, आता तो इतरांनाही ही कला शिकवतो.

https://www.instagram.com/p/BNYx4hzD8Ya/

https://www.instagram.com/p/BLQLA0jDO0J/

https://www.instagram.com/p/BMDeh8yDugC/