‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अमेय वाघ पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. पण, यावेळी तो चर्चेत येण्याचं कारण आहे त्याचं खासगी आयुष्य. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा हा ‘रॉयल कारभारी’ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

अमेयने दोन दिवसांपूर्वीच त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या १३ वर्षांपासून साजिरी देशपांडेला डेट करणारा अमेय सरतेशेवटी विवाहबंधनात अडकणार आहे. अमेयने त्याच्या शैलीत एक धमाल फेसबुक पोस्ट लिहित त्याचं रिलेशनशिप स्टेटस सर्वांसमोर उघड केलं. ‘गेली १३ वर्षे ती मला सहन करते आहे आणि यानंतरही ती माझ्यासोबत सुखाने राहू शकेल, असे तिला वाटते. तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावेत आणि मलाही शुभेच्छा द्याव्यात’, असं अमेयने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Best Selling Car
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री

अमेयने साजिरीसोबतचं नातं सर्वांसमोर उघड करताच कमेंटबॉक्समध्ये अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा : प्रशांत दामलेंच्या गोंडस नातीचे फोटो

amey

amey-1

amey-2

amey-3

अमेय- साजिरीचं हे नातं बऱ्याचजणांच्या माहितीत होतं. कारण, बऱ्याचदा अमेयसोबत साजिरीने काही कार्यक्रमांना हजेरीसुद्धा लावली होती. सोशल मीडियावर साजिरीबद्दलची फारशी माहिती उबलब्ध नसली तरीही तिचे काही फोटो मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. अमेय वाघ हे टेलिव्हीजन आणि वेब विश्वातील एक बरंच गाजलेलं नाव आहे. नुकताच तो ‘मुरांबा’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये त्याने वेब विश्वातील आणखी एक प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या मिथिला पालकर हिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

amey-4

amey-5

amey-6

amey-7

मुख्य म्हणजे ‘मुरांबा’ चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने अमेयने मिथिलासोबतचा एक फोटो व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी शेअर केला होता. या खास दिवशी त्याने मिथिलाचा उल्लेख त्याची प्रेयसी म्हणून केला होता. त्यामुळे अमेय आणि मिथिला एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या. पण, अमेयने हे सर्व त्याच्या चित्रपटासंबंधीची उत्सुकता वाढवण्यासाठीच केलं होतं हे स्पष्ट केलं. मिथिला अमेयची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली हे ही तितकच खरं.

amey-8

amey-9

amey-10