‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ बनलेल्या अनेक बिनधास्त, बेधडक मॉडेल्सनी आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये व बॉलिवूडमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. विशेषतः बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी ‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ हे एक उत्कृष्ट व्यासपीठ मानले जाते. बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर किंगफिशरची मराठमोळी कॅलेंडर गर्ल सोनाली राऊत आता मराठी सिनेमात येण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘लिपस्टिक लगा के’ म्हणत प्रेक्षकांना आपल्या अदाकारीचा जलवा दाखवणारी किंगफिशरची मराठमोळी ‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली राऊत आता आर.पी.जी प्रॉडक्शन प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित ‘हिरो’ या आगामी मराठी चित्रटातल्या आयटम सॉंग करताना दिसणार आहे. या आयटम साँगमध्ये ती अभिनेता भूषण पाटील सोबत थिरकली आहे. नुकतेच या आयटम सॉंगचे चित्रीकरण चित्रनगरीमध्ये संपन्न झाले. एन.एन सिद्दिकी ‘हिरो’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत.

husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Traditional and Kolhapuri style Maharashtrian Recipe Katachi Amti Gives more flavor to puranpolli Note recipe
झणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा

sonali-raut-670

‘मिरची कोल्हापूरची’ असे बोल असलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. निखिल कोटीभास्कर यांनी लिहिलेलं हे भन्नाट आयटम सॉंग रेशमा सोनावणे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात गायलं असून निखिल कोटीभास्कर, सेमल यांच संगीत या गाण्याला लाभलं आहे. या आयटम सॉंगच्या निमित्ताने किंगफिशर कॅलेंडरचे ग्लॅमर मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की. या चित्रपटाचे सहनिर्माते अनिस मोराब आहेत. हिरो चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.

सोनालीने ‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ स्पर्धा जिंकली आणि बॉलीवूडचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले. सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोज’ मधून झळकलेल्या सोनालीने या चित्रपटात नकारात्मक भूमिका रंगविली होती. रणवीरसोबत एका जाहिरातीसाठी तिने केलेलं एक हॉट फोटोशूट खूपच चर्चेत राहिलं. त्याचबरोबर ‘ग्रेट ग्रँण्ड मस्ती’ या चित्रपटातील ‘लिपस्टिक लगाके’ हे सोनालीवर चित्रित झालेलं गाणं तिच्या बिनधास्त अदांनी चांगलंच गाजलं. सोनाली ‘बिग बॉस ८’ तसेच ‘झलक दिखला जा सीझन ९’ मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती.