‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा’ सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी हटके कलाविष्कारांची मेजवानी असते. यंदाच्या सोहळ्यातही एक से बढकर एक कलाविष्कार सादर झाले. यावर्षी ‘कल आज और कल’ अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा’ सोहळ्याची रंगत रविवार २४ जुलै सायंकाळी ६.३० वा. झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.
उर्मिला कानेटकर हिच्या गणेश वंदनेने या पुरस्कार सोहळ्याची शानदार सुरुवात झाली. ‘कल आज और कल’ या थीम नुसार जुन्या व नव्या गीतांवर मानसी नाईक, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मानसी नाईकचा ‘ग्लॅम डान्स’ या सोहळ्यातील खास आकर्षण ठरला. सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, कुशल बद्रिके, विनीत भोंडे, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, रमेश वाणी यांच्या ‘सैराट २’ प्रहसनाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. संतोष पवार, विशाखा सुभेदार, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, विनीत भोंडे यांनी सादर केलेलं ‘बाजीराव – मस्तानी’ या प्रहसनाने हास्याचा बार उडवून दिला. अतुल तोडणकर, संतोष पवार, श्रेया बुगडे, अभिजीत केळकर, नम्रता आवटे, रमेश वाणी या कलाकारांनी  सादर केलेली ‘सात्विक बार’ ही नाटिका ही भन्नाट होती. समीर चौघुले, सागर कारंडे, भूषण कडू, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, प्रियदर्शन जाधव, यांनी सादर केलेल्या ‘नाकाबंदी’ या प्रहसनाने ही चांगलंच मनोरजंन केलं. याशिवाय सर्वात धमाल आणली ती भाऊ कदम यांच्या अभिनेता ‘मेहमूद’ यांच्या स्कीटने तसेच भाऊ कदम, विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, समीर चौघुले यांनी मेहमूद यांच्या विविध गाण्यांवर धरलेल्या ठेक्याने.
मोहन जोशी, पुष्कर क्षोत्री, क्रांती रेडकर, प्रथमेश परब यांचं धम्माल निवेदन, प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, मंचावर सादर होणाऱ्या एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कारांनी ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ची रंगत चांगलीच वाढवली. मनोरंजन क्षेत्रातील विनोदी कलावंताच्या कार्याची दखल घेणारा ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा’ हा शानदार सोहळा रविवारी २४ जुलैला सायंकाळी ६.३० वा. झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

Pankaj Tripathi sister car accident
Video: भर चौकात दुभाजकावर चढली कार अन्…, पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत