आपल्याला समाजात खरी धर्मनिरपेक्षता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असेल तर ते आहे कलाक्षेत्र…. बॉलिवूडमध्ये शाहरुख खानपासून सोहा अली खानपर्यंत अनेक जणांनी जातीपातीच्या बंधनांना दूर ठेवत हिंदू-मुस्लिम विवाहाकडे सकारात्मक पद्धतीनं पाहण्यासाठी लोकांना भाग पाडलं. काही सेलिब्रिटींनी तर एक पाऊल पुढे टाकत त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा धर्मही बदलला. अशा सेलिब्रिंटींवर एक नजर टाकूया.

शर्मिला टागोर- पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी विवाह करताना इस्लाम धर्म कबूल असल्याचे म्हटले होते. इस्लाम धर्म स्वीकाराल्यानंतर शर्मिला यांनी आपले नाव बदलून आएशा सुलताना असे ठेवले.

sharmila-tagore-1

ए आर रहमान- प्रसिद्ध संगीतकार अल्ला रक्खा रहमान म्हणजेच ए आर रहमानचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप कुमार असं होतं. पण नंतर त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करुन नाव बदललं.

ar-rehman-1

अमृता सिंग- शीख-मुस्लिम कुटुंबाशी अमृता जोडली गेलेली आहे. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. १९८३ मध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमृताने ‘बेताब’, ‘मर्द’, ‘साहेब’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले होते.

amrita-singh-1

आयशा टाकिया- हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आयशाने २००९ साली प्रियकर फरहान आझमीशी निकाह केला. त्यापूर्वी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र, आतापर्यंत आयशाने कधीच धर्मांतराबद्दल उघडपणे भाष्य केलेले नाही.

aysha-takia-1

धर्मेंद्र- हिंदू कुटुंबात जन्मलेल्या अभिनेते धर्मेंद्र यांनी १९७९ साली इस्लाम धर्म स्वीकारला. प्रकाश कौर यांच्याशी त्यांनी पहिला विवाह केला होता. त्यानंतर पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमा यांच्याशी लग्न करण्याची धर्मेंद्र यांची इच्छा होती. पण, हिंदू विवाहपद्धतीनुसार ते असे करू शकत नव्हते. त्यामुळे हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याकरिता त्यांनी धर्मांतर केले.

a345694_list_20160517151216