‘कॅप्टन नवाब’च्या पोस्टरुन सध्या इमरान हाश्मीवर ट्विटरवर अनेक टिका होत आहे. हा सिनेमा इमरान हाश्मीच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेला पहिला सिनेमा आहे. या सिनेमात इमरान ‘कॅप्टन नवाब’च्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी त्याने ट्विटरवर शेअर केला होता. पण या पोस्टरची तुलना एका व्हिडिओ गेमशी होत आहे. ‘कॉल ऑफ ड्युटीः ब्लॅक ऑप्स’ या व्हिडिओ गेमचे फोटो आणि कॅप्टन नवाबचे पोस्टर यात फार साधर्म्य आहे. त्यामुळे ट्विटरवर कॅप्टन नवाब आणि कॉल ऑफचे फोटो एकत्र ट्विट व्हायला लागले. या ट्विट्सना उत्तर म्हणून इमराननेही एक ट्विट केले. या फोटोमध्ये इमरान जेवणाच्या ताटाकडे एकटक बघत असताना दिसला आहे. या फोटोच्या खाली त्याने, ‘चमचा आणि काटा कसा पकडू, काय होईल जेव्हा काहींन वाटेल की हेही व्हिडिओ गेमच्या कव्हर फोटोवरुन कॉपी केले आहे तर? #stupidjournalism’ असा मॅसेज लिहिला.
पण इमरानने केलेले हे ट्विट त्यालाच भारी पडताना दिसले. त्याच्या या ट्विटने त्याच्यावर अधिक टिका होऊ लागल्या. एका ट्विटर युझरने त्याला व्यर्थ फोटो टाकण्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. ट्विटरवर इमरानचा मिस्टर एक्स या सिनेमाचे पोस्टरही टाकण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरची तुलना मॅक्स पेन २ या व्हिडिओ गेमशी करण्यात आले आहे. ट्विटरवर ही दोन्ही पोस्टर एकत्र करुन पोस्ट करण्यात आली होती.
इमरान हाश्मी लवकरच महेश भट्ट यांचा थ्रिलर मालिका राज रीबूट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.