आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बेजबरुआ हिने पतीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून गुडगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी बिदिशाच्या पतीला अटक करण्यात आली आहे. बिदिशाने वर्षभरापूर्वीच गुजरातचा रहिवासी असलेल्या निशित झासोबत प्रेमविवाह केला होता. पण निशितचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण असल्याचे बिदाशाला कळले. त्यानंतर त्यांचे या विषयावरुन अनेकदा खटके उडू लागले. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून बिदिशाने आत्महत्या केल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितले.

पहिली दोन वर्षांत आमच्या हनीमूनमध्ये खूप अडथळे आले- शाहरुख खान

बिदिशाच्या मृत्यूची बातमी कळताच निशित गुडगावला न जाता त्याच्या मित्राच्या घरी गाझियाबादला गेला. मित्राच्या घरी त्याने स्वतःचा लॅपटॉप ठेवला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या लॅपटॉपमध्ये पुरावे मिळतील अशी आशा पोलिसांना आहे. सध्या त्याचा मोबाइल पोलिसांच्याच ताब्यात असून सीडीआरच्या आधारे त्याचा पुढील तपास सुरी आहे.

दिशाच्या वडिलांनी तिला फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ती उत्तर देत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुख्य प्रवेशद्वार आणि घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

गर्भनिरोधक गोळ्यांवर कोंकणाने केले मोठे भाष्य

लग्नाच्या आठ महिन्यातच नितिशच्या प्रेमप्रकरणांचा सुगावा लागल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही तकेला. त्यानंतर दोन महिने त्यांचा संसार सुरळीत चालला. पण नंतर पुन्हा त्यांच्याच वाद व्हायला लागले. बिदिशाचे आई- वडील मुंबईत राहतात. त्यांनी नितिशला मुंबईला येण्याबद्दल सुचवले. पण महिनाभर आग्रह करूनही तो मुंबईला गेला नाही, असं पोलिसांनी सांगितलं.