dilip-thakur-loksattaआंतरराष्ट्रीय ख्यातीचे मासिक ‘टाईम’च्या मुखपृष्ठावर परवीन बाबी झळकली आणि या एकाच गोष्टीने तिच्याभोवतीचे ‘वलय’ वाढले…

किशोर शाहू यांच्या ‘धुंए की लकीर’मध्ये त्यांचाच मुलगा विकीची तर बी. आर. इशारा यांच्या ‘चरीत्र’मध्ये सलिम दुराणीची (होय, तोच तो ‘व्ही वॉन्ट सिक्सर’ची मागणी पूर्ण करणारा क्रिकेटपटू) अशा लागोपाठ झळकलेल्या चित्रपटाची नायिका म्हणून परवीन बाबी आली, तेव्हा तिच्या सौंदर्याबाबत दुमत नव्हते पण ही बाहुली अभिनय ती काय करणार असे ठामपणे म्हटले गेले, या शंकेला टाईमच्या तिच्या मुखपृष्ठाने चोख उत्तर दिले. परवीनची वाटचाल रणधीर कपूरपासून ‘भंवर’ अमोल पालेकरपर्यन्त ‘रंगबरंगी’ चौफेर. अमिताभशी तिची ‘मजबूर’पासून जोडी शोभली आणि ‘अमर अकबर अॅन्थनी’, ‘सुहाग’, ‘दो और दो पाँच’, ‘नमक हलाल’, ‘खुद्दार’, ‘शान’, ‘पुकार’ आणि ‘महान’… अगदी चार रिळानंतर बंद पडलेल्या ‘देशद्रोही’तही तीच. अशाने तो तिच्यात खास रस घेतोय अशी चर्चा ही रंगली. खानबंधु फिरोज आणि संजय यांनीही तिच्यावर कृपामर्जी केली (‘काला सोना’, ‘चांदी सोना’ वगैरेत ती दिसली) डॅनी डेन्झोपा, कबिर बेदी, महेश भट्ट हे तिचे खास मित्र आहेत अशीही कुजबूज वाढ वाढ वाढली.

सत्तरच्या दशकात अशी पाश्चात्य व्यक्तिमत्वाची अभिनेत्री आणि तिचा असा मित्रपरिवार म्हणजे कुतुहल वाढताना उगाचच ‘पुरुषी चर्चा’ होणारच… अशा भरधाव वाटचालीनंतरही नव्वदच्या दशकाच्या मध्यास परवीन गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. ती मनशांतीसाठी युरोपला गेलीय यापासून तिच्या मित्रांनीच तिची फसगत केल्याची चर्चा वाढली.

साधारण २००४ मध्ये जुहूच्या कालूमल इस्टेटमधील तिच्या निवासस्थानी तिच्या व्यवस्थापकाने आम्हा काही पत्रकारांशी तिची भेट घडवली. तेव्हा तिची अवस्था पाहवत नव्हती… २० जानेवारी २००५ ला या प्रवासाचा शेवट झाला तेदेखिल तीन दिवसानी समजले. अरेरे…