सध्या ‘घाडगे & सून’मधील अमृता घाडगे म्हणजेच भाग्यश्री लिमये प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. तिच्या मालिकेमधील पात्रामुळे ती आताच्या काळातील मुलींचे प्रतिनिधीत्व करतेय, असा चाहत्यांचा प्रतिसाद तिला मिळतोय. प्रेक्षकांच्या या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे ती खूपच खूश आहे आणि त्याकरिता तिने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.

वाचा : सलमानच्या बहिणीच्या नवऱ्याचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसह काम करण्यास नकार

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

घरातील माणसं, मित्रमैत्रिणी ते मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या व्यक्ती सगळेच भाग्यश्रीला प्रेमाने सोनू असे म्हणतात. तसेच तिला फोटो काढायला देखील खूप आवडते आणि ती सोशल मीडियावरसुद्धा बरीच सक्रिय आहे. खासकरून इन्स्टाग्राम आणि फेसबुक. भाग्यश्री मुळची सोलापूरची असून तिचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असताना ती आणि तिच्या मैत्रिणींचे चिन्मय उदगीरकरवर क्रश होते, त्यांना तो खूपच आवडायचा. याबद्दल भाग्यश्री म्हणाली की, ‘जेव्हा मला घाडगे & सून मालिका मिळाली तेव्हा मी खूपच खूश झाले. विशेष म्हणजे मालिकेत माझ्यासोबत चिन्मय असणार असल्याचे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या मैत्रिणी अजूनही मला त्याच्यावरून चिडवतात. चिन्मय अतिशय चांगला अभिनेता आहे, आणि त्याच्याबरोबर माझा एखादा सीन चांगला झाला की तो मला प्रोत्साहनदेखील देतो.’

वाचा : ‘मेरा नाम जोकर’मधील तो मुखवटा, नर्गिसने वापरलेले कपडे; सर्वकाही नष्ट झालं- ऋषी कपूर

घाडगे & सूनच्या सेटवर सगळेच कलाकार कामासोबत खूप मज्जा, मस्ती देखील करतात. संध्याकाळ झाली की सेटवर माई म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुकन्या ताईचा डब्बा उघडतो. त्यानंतर सेटवर अजूनच अजूनच धम्माल पाहायला मिळते.