चित्रपट म्हटलं की हिरो-हिरोईन आले. आता हे दोघे एकत्र आल्यावर रोमान्स तर यायलाच हवा. कदाचित त्याशिवाय आपल्याकडे चित्रपट पूर्णच होणार नाही. आजच्या घडीला एकजण पतंगगिरी करत कटाक्ष टाकत नजरेनं प्रेम व्यक्त करतोय. तर दुसरा दबंगगिरीनं हिरोईनीच्या मनात घर करताना आपण अनेकदा पाहिलयं आणि आणखी काही दिवस पाहायला ही लागेल. आता इथं भलेही माहिरा पाकिस्तानची असो किंवा आपली सोनक्षी थोडी जाडी असो… पण त्यांचा एक ठुमका हिरोवरच लक्ष विचलित करायला पुरेसा असतो हे वास्तव नाकारता येत नाही. कारण हे हिरो लोकप्रिय नक्कीच असतील पण यांच्यामध्ये बहुदा ‘आनंद’ देणाऱ्या रोमान्सची कमी असावी. ते अभिनय शून्य आहेत वैगेरे असा याचा अर्थ नक्कीच नाही. पण ते एव्हर ग्रीन देव आनंदसारखे अफलातून नाहीत हे मात्र मान्य करावच लागेल.

डुलतोय की पडतोय अशा अवस्थेत पडद्यावर झळकलेल्या माणसानं एक काळ हलवून सोडला. ‘कालापानी’मध्ये मधुबालाला रुसवा घालवायला भाग पाडणारा तसेच अनेक चित्रपटात आपल्या नायिकेचा पाठलाग करुनही नेक असल्याचा भास फक्त त्याच्या अदाकारीतून उमटू शकतो. मधुबाला जरी गीत गात असली तरी या माणसात प्रक्षेकवर्गाचे लक्ष आपल्याभोवती केंद्रीत करण्याती ताकत होती. अदाकारी ही उपमा जरी अभिनेत्रीला लागू होत असली अदाकारीनं बहरलेला नायक शोधायच म्हटलं तर काही पिढ्यांना वेड लावणाऱ्या देव आनंदशिवाय अन्य कोणी सापडणे मुश्किलच आहे. रोमान्सशिवाय या माणसाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याची तरुणपण जगण्याची आणि जपण्याची साधना असो वा स्टाईल स्टेटमेंटच कमिटमेंट असो त्याच्यासारखा तोच होता. यापलिकडे ताणता येणे अशक्यच आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

सध्याच्या घडीला आपण बऱ्याचदा एकतो पाहातो शाहरुख-सलमान विशीतल्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसतात. काय जादू आहे या मंडळींची. पण त्यांना बहुदा हे माहित नसावे देव आनंद यांनी त्यांच्या आपल्या लग्नात जन्मही न झालेल्या झिनत अमानसोबत स्क्रिन शेअर केली. तेही बिकीनीत. गोऱ्या गोमट्या इंग्रजांची लाइफ स्टाईलनं त्याला प्रभावित केल होत. हे त्याच्या ड्रेसपकोडकडे पाहिल्यानंतर सहज लक्षात येत. मात्र त्याच्या या शैलीबद्दल एका कार्यक्रमामध्ये ऐकलेला किस्सा हा अचंबित करणारा होता. म्हणे एकदा रात्री ३ वाजता त्या काळातील बिकीनी गर्ल झिनत अमान त्यांना भेटण्यासाठी गेली होती. पण हा माणूस सुटा-बुटात तिला भेटला म्हणे. बर हे फक्त एवढ्यापुरत नाही तर या माणसाने शेवटपर्यंत हा रुबाब जपला.

एखाद्या नायिकेसोबत नाव जोडले जाणे ही तशी बॉलिवू़डची परंपराच. मग यात देव आनंद नाही, हे होणे अशक्यच. त्यांचही नाव अनेक नायिकांसोबत जोडले गेले. त्यातील सुरयाच्या प्रेमाशिवाय देवानंद कदाचित पूर्ण होणार नाही. त्या जमान्यात भाव खाऊन जाणारी अभिनेत्री सुरयाची चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख होती. अन् ती देव आनंदच्या प्रेमात वेडी होती. या दोघांच्यात प्रेम बहरलं खरं पण हिंदू-मुस्लीम या धर्म संकाटात त्यांच्या प्रेमाचा अस्त झाला. त्यामुळेच एकमेकांसोबत सात चित्रपट करणाऱ्या या जोडीला सातफेरे घेणं शक्य झालं नाही. देव आनंद थांबायला तयार होता. पण सुरयाला मनातील भीती दाबता आली नाही. या भितीच प्रायश्चित तिन अविवाहित राहून भोगलं. ‘अभी ना जाओ छोड के’.. अस म्हणण्याची वेळ सहावर्षांपूर्वी निघून गेली. पण त्याच्या आठवणी या अनंत काळासाठी ‘जी अभी भरा नहीं…’, अशाच सोबत राहतील.