क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या जीवनात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचे आगमन झाले होते. भज्जी आणि गीताच्या या चिमुरडीची पहिली झलकही त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. आता भज्जीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला फोटो चर्चेत आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये भज्जी आणि त्याच्या चिमुरडीची म्हणजेच हिनायाची जर्सी दिसत आहे. लाल आणि सफेद रंगाची सुरेख रंगसंगती असणाऱ्या या जर्सीने अनेकांना भुरळ घातली आहे.

सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला हरभजन त्याच्या कुटुंबासोबत आणि पत्नी गीतासोबतच जास्त वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहे. भज्जीने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याने गीता बसराला उचलून घेतले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने या सुरेख क्षणांचा उल्लेख ‘फिल्मी मोमेन्ट्स’ असा केला आहे. त्यामुळे सध्या ‘ऑनफिल्ड’ सक्रिय नसतानाही भज्जी त्याच्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरील पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका छोट्या परीचे आगमन झाल्यामुळे हरभजन-गीतावर त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

Some filmy 🎥 moments with the boss #wifey

A photo posted by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on