कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम परतले आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. एका मुलाखतीत रणबीरने कतरिनाचे आपल्या आयुष्यातील स्थान काय आहे याबाबत मत मांडल्यामुळे त्याचे आणि कतरिनाचे नाते चर्चेत आले होते. पण या दोघांच्या नात्याला गेलेला तडा मात्र यामुळे भरुन निघाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरच्या आयुष्यात प्रेम परतले आहे. अभिनेत्री श्रृती हसन आणि रणबीर सध्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

एका जाहिरातीच्या निमित्ताने या दोन्ही कलाकारांना रसिकांनी याअगोदरच पडद्यावर एकत्र पाहिले आहे. पण सध्या हे दोघेही कोणत्या जाहिरातीच्या निमित्ताने नाही, तर एकमेकांना डेट करण्याच्या निमित्ताने एकत्र दिसत आहेत. जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान एकत्र आलेल्या या कलाकारांमध्ये चित्रिकरणादरम्यान जवळीक निर्माण झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रणबीर आणि श्रृती यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळेच कॅट आणि सावरिया रणबीरच्या नात्यात दुरावा आल्याचेही म्हटले जात आहे. पण असे असले तरीही आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असेच या कलाकारांचे म्हणणे आहे. रणबीर आणि श्रृती या दोघांचीही नावे त्यांच्या सहकलाकारांसोबत जोडली जात आहेत. पण याबाबत अद्याप काहीही पक्की माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी हे दोन्ही कलाकार ‘बिइंग सिंगल’ या स्टेटसचा पुरेपूर आनंद घेत आहेत असेच म्हणावे लागेल.

अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील रणबीरचा अंदाज आणि चित्रपटातील काही खुमासदार संवाद अनेकांचीच पसंती मिळवत आहेत. अनुष्का आणि ऐश्वर्याच्या लूकचीही रसिकांमध्ये चर्चा आहे. २८ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहुर्तावर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

rk