हृतिक रोशनचा ‘काबील’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवरील ‘रईस’सोबतचा संघर्ष चांगलाच चर्चेत आलाय. दोघांपैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिवर चांगली कमाई करेल याचे तक्र लावले जात असताना आता काबिल सिनेमाच्या प्रदर्शाची तारीखच बदलण्यात आली आहे. याआधी हा सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. शाहरुखचा बहुचर्चित रईस सिनेमाही त्याच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण, आता ‘काबिल’च्या प्रदर्शनाची तारीख बदलून ती २६ जानेवारीवरून २५ जानेवारी करण्यात आली आहे. ‘रईस’ सोबतचा बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळण्यासाठी ही युक्ती काढण्यात आली अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात होत आहे.

‘रईस’ सोबतच्या ज्या संघर्षाबद्दल बोलले जातेय ते ‘काबील’च्या तारीख बदलण्यासाठी मुख्य कारण नाहीच. झालं असं की, साधारणपणे चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असतात. पण, राकेश रोशनच्या होम प्रोडक्शनचा हा सिनेमा असल्याने त्यांनी वितरकांना विनंती केली की, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जर २५ करण्यात आली तर २६ जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिना’ निमित्त सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होऊ शकेल. राकेश रोशन यांना चित्रपटाच्या कथानकावर एवढा विश्वास आहे की, सिनेमा २६ जानेवारीला नक्कीच गर्दी खेचून आणेल असे त्यांना वाटते.

https://www.instagram.com/p/BMLKCFlBdoi/

याशिवाय या सिनेमाचे दिग्दर्शक किंवा निर्माता तेच असल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करेल अशी भीती त्यांना सतावत आहे. काय केले म्हणजे चित्रपटाला पसंती मिळेल आणि रेकॉर्डब्रेक कमाई होईल, असा विचार त्यांच्या डोक्यात सतत सुरूच असतो. त्यामुळे अशा राष्ट्रीय दिवसांचा आधार घेतला जातो. राकेश रोशन हे सध्या त्याच शोधात आहेत. पाहूयात, एवढे करून ‘काबिल’ला कसा प्रतिसाद मिळतोय ते!