बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘ट्युबलाइट’ हा सिनेमा गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. यावर्षीचा बहुप्रतिक्षीत सिनेमा म्हणून याकडे पाहिले जात होते. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जरी धमाल उडवू शकला नाही. सलमानने या सिनेमाचे फार प्रमोशन केले होते. सलमानसोबत त्याचा भाऊ सोहेल आणि दिग्दर्शक कबीर खान यांनीही सिनेमाचे प्रमोशन केले होते. एवढंच काय तर बालकलाकार माटिन रे तंगूही सहभागी झाला होता. पण या सगळ्यांमध्ये चिनी अभिनेत्री झू झूची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. एवढंच काय तर तिने सोशल मीडियावरून या सिनेमाचा उल्लेखही केला नाही. तसेच कोणत्याही मुलाखतीत त्याने बॉलिवूडच्या सुपरस्टारसोबत ‘ट्युबलाइट’मध्ये दिसणार असल्याचेही सांगितले नाही.

अन् पंडित अभिषेकी एकाएकी गायब झाले- अशोक पत्की

सलमानने सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिवस रात्र एक केले होते. तर कबीरने हे आधीच स्पष्ट केले होते की इतर कामाच्या ती प्रमोशनसाठी भारतात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. प्रमोशनपासून जरी दूर असली तरी तिने या दरम्यान तिच्या अन्य कामांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. पण यात ‘ट्युबलाइट’चा उल्लेख कुठेच नव्हता. ‘मिड-डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तिला ‘ट्युबलाइट’ सिनेमापासून लांब राहायला सांगितले होते. एवढंच नाही तर मीडियापासूनही तिला दूर राहायला सांगितले होते. म्हणूनच तिने या दरम्यान कोणतीही मुलाखत दिली नाही.

आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सलमानच्या ‘ट्युबलाइट’ जास्त प्रकाश पाडू शकली नाही. ईदच्या दिवशीही सिनेमाने फक्त १९.९ कोटी रुपयांचीच कमाई केली होती. जर या आकड्यांना भाईजानच्या पाच वर्षांतील त्याच्या सिनेमाच्या आकड्यांशी तुलना केली तर ती फारच कमी आहे. समीक्षकांकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादाचा सिनेमावर मोठा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. हा सिनेमा पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार करण्यात अयशस्वी ठरली होती. चार दिवसांत या सिनेमाने फक्त ८३ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी या सिनेमाने २१.७ कोटींची कमाई केली तर शनिवारी २१.१७ कोटी, रविवारी २२.४५ कोटी आणि सोमवारी १९.०९ कोटी रुपयांची कमाई केली.