बॉलिवू़डमध्ये आपल्या बिनधास्त तोऱ्यात वावरणारी आणि मनमोकळेपणाने बोलणारी अभिनेत्रीमध्ये कंगना रणौतची वर्णी लागते. ती आपल्या मनात कोणत्याही भावना दाबून ठेवत नाही. तिच्या या स्वभावामुळे बऱ्याचदा बॉलिवूडमधील आपल्या सहकाऱ्यांचीही ती गोची करुन टाकते. आपले बोलणे कुणाला लागेल याचा ती बिलकूल विचार करत नाही. तिचे हे बिनधास्त आणि बेधडक बोलणे बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना अडचणीत आणत असते. यापूर्वी अनेक कलाकारांच्या बद्दल व्यक्त होणाऱ्या कंगनाने आता देसी गर्ल प्रियांका चोप्राकाबद्दलच्या भावना समोर बॉलिवू़डमध्ये आपल्या बिनधास्त तोऱ्यात वावरणारी आणि मनमोकळेपणाने बोलणारी अभिनेत्रीमध्ये कंगना रणौतची वर्णी लागते.

ती आपल्या मनात कोणत्याही भावना दाबून ठेवत नाही. तिच्या या स्वभावामुळे बऱ्याचदा बॉलिवूडमधील आपल्या सहकाऱ्यांचीही ती गोची करुन टाकते. आपले बोलणे कुणाला लागेल याचा ती बिलकूल विचार करत नाही. तिचे हे बिनधास्त आणि बेधडक बोलणे बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना अडचणीत आणत असते. यापूर्वी अनेक कलाकारांच्या बद्दल व्यक्त होणाऱ्या कंगनाने आता देसी गर्ल प्रियांका चोप्राकाबद्दलच्या भावना समोर आल्या आहेत. बॉलिवूडमधून थेट हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याची भूरळ घालणाऱ्या प्रियांकाचे हास्य दिखावू असल्याचे कंगनाने म्हटले आहे. प्रियांकाच्या हास्यावर प्रितिक्रिया देऊन थांबते ती कंगना कसली. ही बोचरी टीपण्णी केल्यानंतर कंगनाने प्रियांकाला पिग्गी चोप्स पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे देखील कंगनाने म्हटले.

आपल्या बिनधास्त वक्तव्याने प्रसिद्ध असणारी कंगना सध्या आपल्या हंसल मेहता यांच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. नेहा धुपियाच्या वाईस चॅट या ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमामध्ये ह्रतिक रोशनला लक्ष्य केल्यानंतर कंगनाने प्रियांका विषयी आपल्या मनातील भाव या कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमात नेहाने विचारलेल्या एका सवालावर कंगनाने प्रियांकाच्या हास्य ‘बकवास’ असल्याचे कंगनाने सांगितले. कंगना आणि प्रियांका चोप्रा फॅशन चित्रपटामध्ये एकत्र दिसल्या होत्या. मधुकर भंडारकर यांनी दोघींना एकत्र आणले. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोघींमध्ये वाद निर्माण झाल्याचे चर्चा रंगल्या होत्या.  २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या‘फॅशन’ चित्रपटासाठी कंगनाला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेतील ‘क्वांटिको २’ या मालिकेत झळकत आहे. तिचा हॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘बेवॉच’ हा देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यशाच्या शिखरावर असणारी प्रियांका आपल्या टीकाकारांना तात्काळ प्रत्त्युत्तर देण्यात माहिर आहे. कंगनाने आपल्या हास्याचा मजाक उडविल्यानंतर प्रियांका तिला काय उत्तर देणार याबाबत दोघींच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.