सामान्य जनतेला नेहमीच कलाकारांच्या, सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चालतं याबद्दल उत्सुकता असते. कलाकार दर दिवशी काय करतात, कुठे असतात, कसे राहतात असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात येत असतात. तसेच कलाकारांना स्वयंपाक येतो का हा प्रश्न तर प्रत्येकाला पडलेला असतो. पण प्रेक्षकांच्या या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री क्षिती जोग हिने फोटो काढूनच दिले आहे.

नुकतेच क्षितीने स्वत: लाडू तयार करतानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हे लाडू करताना फार मजा आली असल्याचेदेखील तिने इन्स्ट्राग्रामवर सांगितले आहे. क्षितीचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटलं असेल यात काही शंका नाही. क्षितीचे लाडू बनवतानाचे फोटो पाहिल्यावर तिच्या चाहत्यांनी तिचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. तसेच काही चाहत्यांनी तर क्षिती तुझ्या हातचे लाडू आम्हाला ही खायला आवडतील असे मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत.

History of Indian Election 1951-52
मतदानाला जाण्याआधी काढल्या चपला, मतपेटीला केला नमस्कार- विदेशी माध्यमांनी टिपलं पहिल्या निवडणुकीचं चित्र
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
IFS Himanshu Tyagi advised people With sharing Five tips on becoming a genius you must know
वैयक्तिक अन् व्यावसायिक जीवनात हुशार कसं बनायचं? आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केल्या टिप्स, नक्की वाचा
18 month old baby head stuck in vessel viral video
पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…

क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’  या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिच्या अभिनयाबरोबरच आता तिच्या जेवणाचेही अनेकजण चाहते झाले असतील यात काही शंका नाही.

https://www.instagram.com/p/BME0_xxj5ea/