चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट त्यांच्या आगामी वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका बोल्ड ड्रामासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या ‘माया’ या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. हा ट्रेलर लॉन्च केल्यावर लगेचच सोशल मीडियावर या ट्रेलरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. बोल्ड दृश्ये, मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री, ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या कलाकारांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री या सर्वाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

‘माया’ या वेब सिरीजबदद्ल आणखी माहिती देताना विक्रम भट्ट यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या मुलाखतीदरम्यान विक्रम भट्ट यांनी स्पष्ट केलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘माया’ ही वेब सिरीज ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या चित्रपटावर आधारित नाही.

South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘माया’ ही वेब सिरीज ‘५० शेडस ऑफ ग्रे’ या चित्रपटावर आधारित आहे का? असे विचारले असता विक्रम भट्ट म्हणाले, ‘नाही. पण, दुर्दैवाने गुलाम, शिस्त, वर्चस्व आणि शरणागती या घटकांवर आधारित कोणतीही गोष्ट ‘५० शेड्स ऑफ ग्रे’च्या पठडीतीलच समजली जाते. त्यामुळे या विषयावर जास्त चर्चा करण्यात मला काहीच स्वारस्य वाटत नाही. हे तर फक्त कुस्तीचीच पार्श्वभूमी असल्यामुळे ‘दंगल’ आणि ‘सुलतान’ हे दोन्ही चित्रपट एसारखेच आहेत असे म्हणण्यासारखे झाले’.

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या ‘माया’ या वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये बरीच बोल्ड दृश्ये असल्यामुळे ही वेब सिरीज ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या चित्रपटावरच आधारित असल्याचेस म्हटले जात होते. विक्रम भट्ट यांच्या ‘माया’ या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री शमा सिकंदर मुख्य भूमिकेत दिसत आहे. एका वेगळया प्रकारच्या मनोरंजनासाठी परिपक्व अशा प्रेक्षकवर्गासाठी या वेब सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे असेही विक्रम भट्ट यांनी स्पष्ट केले आहे.