सिनेसृष्टीत ब्लॅकमेलिंगचे अनेक प्रकार वारंवार कानावर येत असतात. कलाकारांना त्यांच्या खासगी गोष्टी उघड करण्याच्या धमक्या विघ्नसंतोषी लोक देत असल्याच्या अनेक घडना घडल्या आहेत. अशीच एक घटना सध्या उजेडात आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री मिथिली ही सध्या अशाच ब्लॅकमेलिंगची शिकार झाली आहे. तीचा एक्स बॉयफ्रेन्ड किरण कुमार (३८) याने तीचे काही खासगी फोटो हे सोशल मीडियावर टाकले असून याप्रकरणी मिथीलीने एर्नाकुलम पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

किरणकुमार हा पल्लकड भागात राहतो. ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने बदनामी करण्याची धमकी देत त्याने अभिनेत्री मिथिलीचे काही खासगी फोटो सोशल मीडिटावर टाकले. किरणकुमार आणि मिथिली हे यापूर्वी २००८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, लग्न झाल्याची बाब त्याने लपवल्याने मिथिलीने त्याच्याशी संबंध संपवले होते. मात्र, तरीही किरणकुमार हा मिथिलीच्या कामाच्या ठिकाणी शुटींग सुरु असताना तसेच तीच्या घरी जाऊन गोंधळ घालत असे.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

किरणकुमारने मिथिलीकडे ७५ लाख रूपयांची मागणीही केली होती. हे पैसे जर तीने दिले नाहीत तर तीचे अत्यंत खासगीतले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तो देत होता. या प्रकारानंतर मिथिलीने थेट पोलिसांत धाव घेऊन किरणकुमार विरोधात तक्रार दाखल केली. या तक्ररीनंतर काही घडले नाही. मात्र, त्यानंतर मिथिलीला सिनेसृष्टीत मिळत असलेली प्रसिद्धी पाहून किरणकुमारने तीचे फोटो अपलोड करण्याचे ठरवले आणि त्याने हे केले देखील. विशेष म्हणजे, किरणकुमारसोबतचे मिथिलीचे फोटो व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरून वेगाने व्हायरलही झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा मिथिलीने या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिथिलीचे फोटो व्हायरल करण्यामध्ये आणखी काही लोकांचा हात असल्याचे समोर आले आहे. या लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे एर्नाकुलमचे सहाय्यक पोलिस आयुक्त के. लालजी यांनी सांगितले.